मुंबई : मुंबई महापालिकेत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांना मदत म्हणून आयुक्त फेलोशिप अंतर्गत 15 खाजगी उमेदवारांची नियुक्ती करणार आहेत. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या धर्तीवरच मुंबई महानगरपालिकेतही खासगी फेलोशिप कार्यक्रम राबवला जात आहे.
या खासगी फेलोशिप अंतर्गत 15 जणांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि पालिका प्रशासनामधील बड्या अधिकाऱ्यांना तांत्रिक बाबतीत मदत केली जाईल. मात्र, पालिका आयुक्त या फेलोशिपच्या नावाखाली महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि अधिकारी यांवर वॉच ठेवणार अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात रंगली आहे.
याबाबतचा प्रस्ताव आज गटनेत्यांच्या सभेत मंजुर झाला आहे. खासगी फेलोशिपच्या उमेदवारांची नियुक्ती करण्याला विरोधी पक्षांनी मात्र विरोध केला केला आहे. आयुक्तांना आपल्या अधिकाऱ्यांवर भरोसा नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काय आहे खाजगी फेलोशिप कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास प्रक्रिया आणि निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळावा, त्यातून समाजसेवा करण्यासाठी सुजाण नागरिक तयार व्हावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी फेलोशिप कार्यक्रम जाहीर केला. तशी तरुणांची नियुक्तीही करण्यात आली. त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेत 15 फेलोशिप उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी 111 जणांनी अर्ज केला होता. त्यामधून 15 जणांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना 75 हजार ते एक लक्ष 25 हजार इतके मानधन दिले जाणार आहे.
या उमेदवारांना पालिका उपायुक्त कार्यालय, सहाय्यक आयुक्त कार्यालयात नियुक्त केले जाणार आहे. तसेच महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयातही फेलोशीप उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिकेच्या विविध विभागांमधील दैनंदिन कामकाज प्रक्रीया, कामकाजादरम्यान ताळमेळ साधणे, काम गतीमान होण्यासाठी पाठपुरावा करणे इत्यादीकरता या 15 फेलोशीप उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या फेलोशिपअंतर्गत कुठेही कामाचा एक वर्ष किंवा अधिक कालावधीचा अनुभव असलेल्या आणि एमबीए पदवीधर उमेदवारांची 11 महिन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. हे फेलोशिप उमेदवार थेट पालिका आयुक्तांना रिपोर्टींग करणार आहेत.
शिवसेनेचे महापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा 'खाजगी' वॉच?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2019 10:11 PM (IST)
याबाबतचा प्रस्ताव आज गटनेत्यांच्या सभेत मंजुर झाला आहे. खासगी फेलोशिपच्या उमेदवारांची नियुक्ती करण्याला विरोधी पक्षांनी मात्र विरोध केला केला आहे. आयुक्तांना आपल्या अधिकाऱ्यांवर भरोसा नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -