मुंबई : विद्रोही साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या स्मरणार्थ 'समष्टी फाऊंडेशन'तर्फे 'सारं काही समष्टीसाठी 2019' चा सोहळा मुंबई विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला निर्माते दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची खास उपस्थित होती.

'सारं काही समष्टीसाठी 2019' चा सोहळा शनिवारी आणि रविवारी मुंबई विद्यापीठातील मराठी भाषा भवनात आयोजित केला होता. यंदा हा सोहळा 'डॉ. आंबेडकर सेंटर फॉर सोशल जस्टीस' आणि 'अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स' आणि 'समष्टी फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.



यंदा 'सारं काही समष्टीसाठी 2019' सोहळ्यामध्ये समष्टी पुरस्कार 2019, गोलपीठा पुरस्कार 2019 हे दोन पुरस्कार प्रदान केले गेले. या वर्षीचा 'समष्टी पुरस्कार' शोषित, वंचित आणि जात वास्तवावर आधारित प्रश्न आपल्या कादंबरी आणि सिनेमातून मांडणारे तामिळ सिनेमा लेखक, दिग्दर्शक मारी सेल्वराज यांना प्रदान करण्यात आला.

पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने शोषित-पीडितांचा आवाज होऊन कार्यरत असलेल्या 'द वायर'च्या सुकन्या शांता यांना या वर्षीचा गोलपीठा पुरस्कार दिला गेला. मानपत्र आणि रोख रक्कम 25 हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

यासोबत सोहळ्यात 'नांगेली' हे नाटक सादर करण्यात आलं. या नाटकाने प्रेक्षकांसोबत दिग्दर्शित अनुराग कश्यप यांचंही मन जिंकलं.