मुंबई : सचिन वाझे यांनी वापरलेली जी मर्सिडीज कार एनआयएने जप्त केली आहे, त्या कारच्या मालकाने एबीपी न्यूजशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली. सचिन वाझे यांना आपण ओळखत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांनी ही कार कुणालातरी विकली होती. एनआयएला याच मर्सिडीज कारमध्ये पाच लाखांहून अधिक रोख रक्कम सापडली होती. तसेच पँट, शर्ट आणि एका बाटली केरोसिन सापडलं होतं. सचिन वाझे यांना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटकप्रकरणी अटक केली आहे. 

एबीपी न्यूजचे रिपोर्टर सूरज ओझा आणि या कारचे मालक यांच्यात झालेले संभाषण

रिपोर्टर - मी सूरज बोलतोयकार मालक- मर्सिडीज मालक- एबीपी न्यूज, हा बोला

रिपोर्टर -एनआयएने एक कार जप्त केली आहे, जी सचिन वाझे यांची आहे. ती कार तुमच्या नावे रजिस्टर आहे. ती कार तुम्ही विकली होती की सचिन वाझे ती वापरत होते?कार मालक- नाही, माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. मी ती गाडी फेब्रुवारी महिन्यातच विकली होती. मला हे प्रकरण काही माहिती देखील नाही. माझा याच्याशी काहीही संबंध नाही. 

सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएच्या ताब्यात; कारमधून बॅग, डायरी, शर्ट आणि काही रक्कम जप्त

रिपोर्टर -फेब्रुवारीमधील ती कार सचिन वाझे यांनाच विकली होती की इतर कुणाला विकली होती?कार मालक- मी याबद्दल पोलीस आणि एनआयला माहिती देईल. मी ती गाडी कुणाला विकली याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. मी त्यांना संपूर्ण  सहकार्य करेल. 

रिपोर्टर -कोणत्या तपास यंत्रणेने तुमच्याशी संपर्क साधला आहे का?कार मालक- अजून तरी कुणी संपर्क साधलेला नाही? 

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकं असलेल्या स्कॉर्पिओ कारपासून या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली. त्यानंतर याप्रकरणात दुसरी कार समोर आली ती म्हणजे, अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवून आरोपींनी पळ काढलेली इनोव्हा कार. आणि आता या प्रकरणात तिसऱ्या कारची एन्ट्री झालेली आहे ती म्हणजे, सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार. आता या मर्सिडीजचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.