मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयात होणारे रॅगिंग सारखे प्रकार रोखण्यासाठी लवकरच रॅगिंग विरोधी पथक प्रत्येक महाविद्यालयात स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली आहे. या समितीत स्थानिक पोलीस ठाण्याचे मुख्य निरीक्षक, स्थानिक पत्रकार, समाज सेवक आणि महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचे प्राध्यापक यांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे लवकरच तज्ञांकडून ब्रेन स्टॉर्मिंगही करणार असल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली आहे.
पालघर येथील वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या रॅगिंगच्या प्रकरणानंतर प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग विरोधी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी पालघर येथील डॉ.एम.एल ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या होमिओपॅथिक महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आपला मानसिक छळ झाल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी महिला डॉक्टरच्या तक्रारीनंतर पालघर पोलिसांनी 15 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना महाविद्यालयातूनही काढून टाकण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी घडलेले पायल तडवी आत्महत्या प्रकरण आणि आता पालघर येथील रॅगिंग प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत डॉ. तात्याराव लहाने यांनी प्रत्येक महाविद्यालयात रॅगिंग विरोधी समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे प्रत्येकी दहा विद्यार्थी एका प्राध्यापकाकडे ब्रेन स्टोरमिंगसाठी देण्यात येणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात घडणारे रॅगिंगचे प्रकार हे प्रामुख्याने द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांकडून होतं असल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळे महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे लवकरच तज्ञांकडून ब्रेन स्टॉर्मिंगही करणार असल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच रॅगिंग विरोधी समिती, विद्यार्थ्यांचे ब्रेन स्टॉर्मिंगही होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Nov 2019 11:03 PM (IST)
वैद्यकीय महाविद्यालयात घडणारे रॅगिंगचे प्रकार हे प्रामुख्याने द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांकडून होतं असल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळे महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे लवकरच तज्ञांकडून ब्रेन स्टॉर्मिंग करणार असल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली आहे.
Getty Images)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -