'वन अबव्ह'च्या तीन मालकांपैकी एक अभिजीत मानकर आगीच्या घटनेनंतर फरार आहे. मात्र त्याची कार विशाल कारियाकडे मिळून आली. ही कार त्याच्याकडे कशी आली? याबाबत त्यानं समानधानकारक उत्तर न दिल्यानं पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली. शिवाय त्याची चौकशी केली असता त्याने ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. करियाचे क्रिकेटपटूंसोबत जवळचे संबंध असल्याची माहिती मिळते आहे.
विशाल कारिया, बाळा खोपडे कमला मिल अग्नितांडवाचे मास्टरमाइंड?
दरम्यान, काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी काल (मंगळवार) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विशाल कारिया यांच्यावर कमला मिल प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.
विशाल कारियाला पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विधीमंडळात आवाज उठवू, असा इशाराही यावेळी नितेश राणे यांनी दिला.
कमला मिल्स कम्पाऊण्ड आग प्रकरण
मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
गुरुवार 28 डिसेंबरच्या रात्री 12.30 च्या सुमारास मोजोस पबला भीषण आग लागली होती. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
संबंधित बातम्या :