मुंबई : भारताने पाकव्याप्त काश्मिरात असलेल्या दहशतवाद्यावर पहाटे केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात भारतीय वायुसेनेचं कौतुक केलंय जातंय. 145 वर्ष जुन्या असलेल्या आणि मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांनी सुरु केलेल्या मुंबईतील सीएसटी भागात असलेल्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेतील आणि महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने एकत्र येऊन जल्लोष साजरी केला.

VIDEO | भारताच्या 'एअर स्ट्राईक'नंतर अंजुमन-ए-इस्लाम शाळा, महविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया | एबीपी माझा



आज शाळा-कॉलेजमध्ये अनेकांच्या परीक्षा सुरु होत्या तरी देखील, परीक्षा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या भारतीय जवानांचा कौतुक करत जल्लोष केला. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन, देशभक्ती पर गीत गात, घोषणा करत, फटाके वाजवत जल्लोष साजरा केला.

'भारत माता कि जय', 'वंदे मातरम', 'हाऊस द जोश' या घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने प्रेरित झालेला पाहायला मिळाला. या जल्लोषात विद्यार्थ्यांसोबत, शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचारीसुद्धा सहभागी झालेले पाहायला मिळाले. 'आपण ज्याची वाट पाहत होतो, तो बदला देशाने अखेर घेतला', 'हा नवा भारत आहे, जो घरात घुसून खात्मा करतो' अशा भावना यावेळी विद्यार्थ्यांनी मांडल्या.

VIDEO | पाकिस्तानकडून काश्मिरात पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन | एबीपी माझा