मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. खंबाटा कंपनीतील गैरव्यवहारांबाबत त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. या गैरव्यवहारात शिवसेनेचे खासदार सहभागी असल्याची शक्यता दमानियांनी व्यक्त केली आहे.


अंजली दमानियांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन खंबाटा कंपनीच्या 2100 कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत चर्चा केली. खंबाटा जांपाणीच्या गैरव्यवहाराचे सर्व कागदपत्र त्यांनी उद्धव ठाकरेंना दाखवली. या गैरव्यवहारात खासदार विनायक राऊत यांचा सहभाग असण्याची शक्यताही दमानियांनी व्यक्त केली.

अजली दमानिया आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीदरम्यान खंबाटा कंपनीचे कर्मचारी, कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, खासदार विनायक राऊत आणि मिलींद नार्वेकर उपस्थित होते. या गैरव्यवहारावर चर्चा करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी 5 जानेवारीला उद्धव ठाकरेंची खंबाटा कंपनीचे मालक गौरव भाटिया, अंजली दमानिया, GVK चे संजय रेड्डी, सूर्यकांत महाडिक, विनायक राऊत, आणि खंबाटाचे कर्मचारी यांची मातोश्रीवर पुन्हा बैठक होणार आहे.