मधुकर पिचड हे आदिवासीच : सर्वोच्च न्यायालय
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2017 02:37 PM (IST)
नवी दिल्ली/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर पिचड यांच्यासह तमाम महादेव कोळी बांधवांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. महादेव कोळी आणि कोळी महादेव या दोन्ही जाती एकच असून त्या आदिवासी असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आदिवासी मन्ना जमातीने मधुकर पिचड यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. पिचड कोळी महादेव जातीचे असताना त्यांनी महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र सादर केलं होतं. महादेव कोळी या जातीचा राज्याच्या जातीच्या यादीत समावेश नाही. मात्र पिचड यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मधुकर पिचड यांचं आदिवासी आरक्षण कायम राहणार आहे. संबंधित बातमी : राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांचं जात प्रमाणपत्र रद्द