विधान परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी गेल्या काही काळापासून दिवाकर रावते होते. मात्र मंत्रीमंडळात असल्यानं त्यांना शिवसेनेची भूमिका नीट मांडता येत नव्हती. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनिल परब यांनी मोलाची कामगिरी करत शिवसेनेला आपला गड राखण्यास मदत केली होती. त्याचंच बक्षीस म्हणून त्यांची विधान परिषद गटनेतेपदी वर्णी लागल्याचं बोललं जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडून विधान परिषदेतील सेनेच्या मंत्र्यांच्या खांदेपालटाचे स्पष्ट संकेत शिवसेनेकडून देण्यात आले आहेत. त्यासाठीच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. शिवसेनेची ही बैठक अनेक बदलांची नांदी असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
संबंधित बातम्या
शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक
उद्धव ठाकरेंकडून पक्षांतर्गत मोठ्या फेरबदलांचे संकेत : सूत्र
शिवसेना मंत्र्यांच्या खांदेपालटाची चर्चा, अनेक मंत्र्यांना डच्चू?