मुंबई : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वपक्षीय आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं. मात्र, स्नेहभोजनासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आमंत्रण दिले नाही. स्नेहभोजनासाठी शिवसेनेला वगळल्याने चर्चांना उधाण आले आहे.

शेकाप, रासप, मनसे, एमआयएम, सपा, भारीप, माकप यांसह अपक्ष आमदारांना भाजपने स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांना आमंत्रण दिले नाही.

सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला भाजपने स्नेहभोजनासाठी वगळण्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. अधिवेशन संपताना भाजपने स्नेहभोजन ठेवत शिवसेनेला एकप्रकारे संकेत दिले आहेत. स्नेहभोजनाच्या माध्यमातून संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेने विरोधकांना साथ दिल्यामुळे सरकारवर नामुष्की अाली होती. सरकारला अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी 19 आमदारांचा निलंबन करावं लागलं होतं.

स्नेहभोजनासाठी ‘या’ आमदारांना आमंत्रण

भाजप - 122

अपक्ष - 7

बहुजन विकास आघाडी - 3

रासप - 1

शेकाप 3

मनसे - 1

एमआयएम - 2

सपा - 1

भारीप - 1

माकप – 1

स्नेहभोजनासाठी ‘या’ आमदारांना आमंत्रण नाही


काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

शिवसेना - 63