मुंबई : बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर काही वेळातच मुलगा अभिषेक बच्चन याने देखील आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं ट्विटर वर सांगितलं. अमिताभ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत महानायक अमिताभ बच्चन हे कोरोना वर मात करुन पुन्हा उत्साहाने नवी ऊर्जा घेऊन आपल्या चाहत्यांसमोर नवीन भुमिका घेऊन परततील, असं ट्विट केलं आहे.


अनिल देशमुख यांचे ट्विट
"महानायक अमिताभ बच्चन जी हे कोरोना वर मात करुन पुन्हा उत्साहाने नवी ऊर्जा घेऊन आपल्या चाहत्यांसमोर नवीन भुमिका घेऊन परततील, "शहेनशाह" कोरोनाची "दिवार" तोडून "अग्निपथावर" मात करुन आपल्याला "आनंद" देतील हीच सदिच्छा.





कुटुंबीयातील अन्य सदस्यांच्या टेस्ट निगेटीव्ह
अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताचं. कुटुंब आणि स्टाफ मधील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने त्यातील सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ऐश्वर्या राय बच्चन, आराध्य बच्चन आणि जया बच्चन यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.


अमिताभ आणि अभिषेक यांना सौम्य लक्षणं
एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. अमिताभ यांना सुरुवातीला सौम्य लक्षणं दिसताच त्यांनी कोरोना टेस्ट करुन घेतली. त्यांच्या आणखी चाचण्या करण्यात येत असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे. अमिताभ आणि अभिषेक दोन्ही बापलेकांना मुंबईतील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.


Amitabh Bachchan Corona positive | कोरोना झाल्याने महानायक अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल