अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर
एबीपी माझा वेब टीम | 11 Sep 2017 01:16 PM (IST)
महिला आणि बालविकास विभागाने जाहीर केलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठीचा मानधनवाढीचा प्रस्ताव वर्षभर रखडल्यानं हा संप पुकारण्यात आला आहे.
मुंबई: राज्यातील 2 लाख 7 हजार अंगणवाडी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. महिला आणि बालविकास विभागाने जाहीर केलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठीचा मानधनवाढीचा प्रस्ताव वर्षभर रखडल्यानं हा संप पुकारण्यात आला आहे. जोपर्यंत सरकार ठोस कृती करत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहील अशी भूमिका अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यभरातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडय़ा सोमवारपासून बंद असणार आहेत.