मुंबई : संततधार पावसाचा मुंबईतील लोकल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले एंडच्या बाजूने पुलाचा मोठा भाग कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेट ते वांद्रे आणि विरार ते गोरेगावदरम्यान वाहतूक सुरु आहे. गारेगाव ते वांद्रे दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
अंधेरी पूल दुर्घटना : आतापर्यंत काय-काय घडलं?
- सकाळी साडे सात वाजता गोखले पुलाचा फुटपाथ कोसळला
- ओव्हरहेड वायर तुटल्या.
- पश्चिम रेल्वेची संपूर्ण वाहतूक बंद
- घटनेत दोन जण जखमी, एक जण अडकल्याची भीती
- चर्चगेट ते वांद्रे, विरार ते गोरेगावपर्यंत वाहतूक सुरु
- ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या.
- ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या.
- पूल 1960 साली बांधल्याची माहिती
- एनडीआपएफ, अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरु
फलाट क्रमांक 8 आणि 9 यांच्यामधील हा ब्रिज होता. तो कोसळला. हा पूल खूपच जीर्ण झाला होता, त्याला लोखंडाचा सपोर्ट दिला होता. मात्र आज सकाळी साडेसातच्या सुमारास तोही कोसळला.
ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या.
ब्रिज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. पावसामुळे हा ढिगारा काढणं मोठं जिकीरीचं काम आहे.
ब्रिज कोसळल्याने जीवितहानी झालेली नाही. दोघे जखमी झालेले आहेत. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे वाहतूक सुरु करणं हे मोठं आव्हान आहे.
गोखले पूल दुर्घटनेनंतर वाहतुकीसाठी सूचना
अंधेरी पूर्व ते पश्चिम प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बिस्लेरी जंक्शन-तेली गल्ली-सुर्वे चौक-अंधेरी सब वे-एस व्ही रोड या मार्गाचा वापर करावा : मुंबई पोलीस
अंधेरी पश्चिम ते पूर्व प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जेव्हीपीडी-सुजय हॉस्पिटल जंक्शन-मिठीबाई कॉलेज-एसव्ही रोड-कॅ. गोर उड्डाणपूल पार्ले-पार्ले पूर्व-आधार जंक्शन ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या मार्गाचा वापर करावा : मुंबई पोलीस
एसव्ही रोड ते वेस्टर्न हायवे किंवा वेस्टर्न हायवे ते एसव्ही रोड जाणाऱ्यांसाठी सूचना : मृणलताई गोरे उड्डाणपूल/खिरा नगर जंक्शन-मिलन उड्डाणपूल/ खार सब वे या मार्गाचा वापर करावा : मुंबई पोलीस
संबंधित बातम्या :
अंधेरीत ब्रिजचा फुटपाथ कोसळला, दोन जण जखमी
अंधेरी पूल दुर्घटना : आतापर्यंत काय-काय घडलं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jul 2018 09:35 AM (IST)
पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेट ते वांद्रे आणि विरार ते गोरेगावदरम्यान वाहतूक सुरु आहे. गोरेगाव ते वांद्रे दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -