Anant Ambani Radhika Merchant Engagement:  रिलायन्स उद्योग समूहाचे (Reliance) सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा लेक अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा साखरपुडा पार पडला. मुंबईतील अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी एकमेकांना अंगठ्या परिधान केल्या.  साखरपुड्यासाठी अँटिलिया रोषणाईनं उजळलं होतं. 






अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे पार पडला. गोल धना आणि चुनरी विधी (Gol dhana and Chunari Vidhi) या  परंपरेप्रमाणे दोघांचा साखरपुडा झाला. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब हजर होतं. साखरपुड्याचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासोबत मुलगी ईशा अंबानी आणि जावई आनंद पीरामलही दिसून आले. त्याशिवाय मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका दिसत आहेत.  




कोण आहे राधिका मर्चंट ?


 राधिका मर्चंट (Radhika Merchant) ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका आणि अनंत (Anant Ambani) खूप दिवसांपासून एकमेकांचे मित्र आहेत. 28 वर्षांची राधिका एक ट्रेंड डान्सर आहे. राधिकाने (Radhika Merchant) श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांच्याकडून भरतनाट्यम् शिकली आहे. राधिका (Radhika Merchant) कुटुंब गुजरातमधील कच्छ येथील आहे. राधिकाच्या (Radhika Merchant) धाकट्या बहिणीचे नाव अंजली मर्चंट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 18 डिसेंबर 1994 रोजी मुंबईत जन्मलेल्या राधिकाने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल, जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून घेतलं आहे. राधिका न्यूयॉर्क विद्यापीठातून पॉलिटिक्स आणि अर्थशास्त्रात पदवीधर आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर, 2017 मध्ये राधिका रिअल इस्टेट फर्म Isprava टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून सामील झाली. राधिकाला (Radhika Merchant) पुस्तके वाचण्याची, ट्रेकिंगची आणि पोहण्याची आवड आहे. 2018 मध्ये राधिकाचा (Radhika Merchant) अनंत अंबानीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत आहे. आता दोघांचा साखरपुडा पार पडला.