मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांना पोषण आहार पुरवणाऱ्या महिला संस्था आणि महिला बचत गटांचं पेमेंट रखडलेलं आहे. गेली एक ते दीड वर्ष पैसे रखडले असल्याने 260 महिला संस्था अडचणीत आहेत. या महिला संस्थांचे प्रश्न घेऊन मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्या भेटीला गेल्या होत्या.
महापालिका शाळेत ज्या महिला पोषण आहार पुरवतात, त्यांचं वेतन थकित होतं. पोषण आहाराच्या टेंडरसंदर्भातही त्यांच्या अडचणी होत्या. या महिला संस्थांद्वारे महिलांना मिळणारा रोजगार टिकून राहण्यासाठी त्यांचं वेतन वेळेवर देणं आणि टेंडर प्रक्रियेतील अडचणी सोडवणं गरजेचं आहे.


VIDEO | अंगणवाडी सेविकांच्या मदतीला अमृता फडणवीस, समस्यांसदर्भात पालिका आयुक्तांची भेट | मुंबई | एबीपी माझा



महापालिका आयुक्तांशी भेट घेऊन पोषण आहार पुरवणाऱ्या महिला संस्थांचे प्रश्न अमृता फडणवीसांनी मांडले. आयुक्तांनी सकारात्मक पावलं उचलू असं आश्वासन दिलं आहे. राज्यभरातल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबतही लवकरच पावलं उचलण्याचं आश्वासन दिल्याचं मिसेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबई | सेल्फी नव्हे, शुद्ध हवेसाठी जहाजाच्या काठावर बसले होते, अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया