या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे गुंड साथीदार फरार झाले आहेत. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. पनवेल मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचं समजतं.
29 एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर प्लॅनिंगने हा हल्ला करण्यात आला आहे. कामोठे पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.