मुंबई : लॉकडाऊनदरम्यान वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजत या संदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील 23 जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळालं. त्यामुळे सामान्यांना एक न्याय आणि श्रीमंत धेंडांना वेगळा न्याय कसा?, त्यातही घोटाळ्याच्या आरोपींना संचारबंदीत फिरण्याची मुभा कशी काय मिळाली यांसह अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.


दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना फोन करुन वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.







या प्रकारानंतर सरकारवर सर्व स्तरातर टीकेची झोड उठली. तसंच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी भाजपच्या अनेक नेत्यांनी केली. या प्रकरणात कारवाईला सुरुवात करत, गृहमंत्रालयाच्या ज्या गृह सचिवांचं पत्र वाधवान कुटुंबीयांकडे होतं, त्या अमिताभ गुप्ता यांची चौकशी होणार आहे. चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. यासंदर्भात अनिल देशमुख यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "मुख्यमत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना चौकशी होईपर्यंत तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे."






वाधवान कुटुंबाला संचारबंदीत प्रवासाची परवानगी कशी? किरीट सोमय्यांचं चौकशीचीसाठी राज्यपालांना पत्र


स्थानिकांच्या तक्रारीनंतर वाधवान कुटुंब ताब्यात
वाधवान कुटुंब मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिल परिसरातं राहतं. मुंबईहून हे कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचलं असता, स्थानिकांनी 23 जणांना पाहून याचा विरोध केला आणि लॉकडाऊनदरम्यान हे लोक महाबळेश्वरला कसे पोहोचले. काही रहिवाशांनी याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वरमध्ये पोहोचलेल्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या वाधवान कुटुंबातील सर्व सदस्यांना विलग करण्यात आलं आहे. महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्यांमध्ये कुटुंबातील महिला आणि मुलांचाही समावेश आहे.


'त्या' 23 जणांमध्ये कुणाचा समावेश?


कपिल वाधवान
अरुणा वाधवान
वनिता वाधवान
टीना वाधवान
धीरज वाधवान
कार्तिक वाधवान
पूजा वाधवान
युविका वाधवान
अहान वाधवान
शत्रुघ्न घागा
मनोज यादव
विनीद शुक्ला
अशोक वाफेळकर
दिवाण सिंग
अमोल मंडल
लोहित फर्नांडिस
जसप्रीत सिंह अरी
जस्टीन ड्मेलो
इंद्रकांत चौधरी
प्रदीप कांबळे
एलिझाबेथ अय्यापिल्लई
रमेश शर्मा
तारकर सरकार


लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला, गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळाल्याने खळबळ


देश लॉकडाऊन असताना मुंबईतून महाबळेश्वरात दाखल झालेल्या वाधवान कुटुंबामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सात गाड्यांमधून हे 23 जण मुंबईतून बुधवारी (8 एप्रिल) सायंकाळी साडेपाच वाजता महाबळेश्वरमध्ये आले. डीएचएसएल दिवान हौसिंग फाईनान्स यांच्या बंगल्यावर हे सर्वजण वास्तव्यास होते. 23 मध्ये बंगल्याचे मालक आणि कामगारांचा समावेश आहे. महाबळेश्वरातील गणेश नगर सोसायटी शेजारी हा बंगला आहे. या सर्वांना पाचगणीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखाने दिली.


कपिल वाधवान, धीरज वाधवान रियल इस्टेट कंपनी एचडीआयएल (HDIL), फायनान्स कंपनी डीएचएफएल (DHFL) सह अनेक कंपन्यांचे मालक आहेत. वाधवान बंधु डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी जामीनावर बाहेर आहे. याशिवाय वाधवान बंधु पीएमसी बँक घोटाळ्यातही आरोपी आहेत.


Anil Deshmukh | वाधवान प्रकरणी गृहमंत्रालय चौकशी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख