मुंबई :  बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan)  यांचा सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या हेड कॉन्स्टेबलची बदली करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंची (Jitendra Shinde) वार्षिक कमाई दीड कोटीच्या घरात असल्याची चर्चा आहे. कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंच्या कमाईच्या चर्चेनंतर पोलीस आयुक्तांकडून त्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. 


एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र वर्षाला दीड कोटी रुपये कमवतात, अशी माहिती समोर आली होती.  जितेंद्र शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून बिग बींना सुरक्षा पुरवत आहेत.  जितेंद्र शिंदे यांची स्वत:ची खाजगी सिक्युरीटी एजन्सी देखील आहे, अशीही माहिती समोर आली होती. हे समोर आल्यानंतर हा प्रकार पोलिस नियमांच्या विरुद्ध आहे. कारण शिंदे हे सध्या खात्यात कार्यरत आहेत. हेड कॉन्स्टेबल या पदावर ते कार्यरत आहेत. ते 2015 पासून अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून नियुक्त आहेत. 


अमिताभ बच्चन यांच्या मराठमोळ्या बॉडीगार्डचा पगार ऐकून थक्क व्हाल! एखाद्या कंपनीच्या सीईओपेक्षाही जास्त वेतन


पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फर्मान काढलं होतं की, चार वर्षांपेक्षा अधिक काळ कुणीही व्यक्ती एका पदावर, एका पोलिस स्टेशनला नसेल. या नियमांतर्गत शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. आता शिंदे यांना अमिताभ बच्चन यांच्या सेक्युरिटीमधून काढून डी बी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी देखील करण्यात येणार आहे. हा प्रकार गंभीर असून खरंच शिंदे यांना इतकं वेतन दिलं जात होतं का? याबाबत अमिताभ बच्चन यांच्याकडूनही माहिती घेतली जाणार आहे.


काय माहिती समोर आली होती?


जितेंद्र शिंदे हे सावलीसारखे अमिताभ बच्चन यांच्या सोबत नेहमी दिसून यायचे. शिंदे यांच्या पगाराबाबत एक मोठी माहिती समोर आली होती.  जितेंद्र शिंदे यांचा पगार हा एखाद्या बड्या कंपनीच्या सीईओपेक्षाही अधिक आहे. त्यांच्या वेतनाचा आकडा थक्क करणारा आहे. एका  रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र वर्षाला दीड कोटी रुपये कमवतात. म्हणजे ते महिन्याला जवळपास 12 लाख रुपये इतका पगार घेत असल्याचं समोर आलं आहे. जितेंद्र शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून बिग बींना सुरक्षा पुरवत आहेत. जितेंद्र शिंदे यांची सिक्युरीटी एजन्सी देखील आहे, अशी माहिती समोर आली होती.  अमेरिकेचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता एलिजा वुड भारतात आला होता त्यावेळी देखील शिंदे यांनी त्यांना सुरक्षा पुरवली होती. अर्थात बिंग बी बच्चन यांच्या सांगण्यावरूनच शिंदे यांनी एलिजा वुडला सुरक्षा दिल्याची माहिती आहे.