Amit Shah Mumbai Visit LIVE : राजकीय शक्ती आणि गणेशभक्ती! मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अमित शाह मुंबई दौऱ्यावर

Amit Shah Mumbai Visit LIVE Updates : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अमित शाह मुंबई दौऱ्यावर, भाजप नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक, लालबागचा राजा आणि प्रमुख नेत्यांच्या घरी गणपतीचं दर्शन

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Sep 2022 03:11 PM
मुंबईत वर्चस्व केवळ भाजपचं असावं, उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा : अमित शाह





Amit Shah Mumbai Tour : राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. 


अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पाडली. या बैठकीला संबोधित करताना अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. अमित शाह म्हणाले की, तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. वर्ष 2019 मधे पहिल्यांदा भाजपचं संपूर्ण बहुमताचं सरकार आलं. असं पहिल्यांदाच झालं आहे. वर्ष 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती असा गौप्यस्फोट शाह यांनी केला. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 






केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, शाहांचा ताफा वांद्र्याच्या दिशेनं रवाना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक

अमित शाह लालबागच्या राजाच्या मंडपात दाखल

Hingoli Rain News :जिल्ह्यात रात्री पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला, पाऊस पिकांना फायदेशीर  

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील अनेक पिके वाळत होती. परंतु रात्रीच्या पावसाने पिकांना नवचैतन्य मिळाले आहे. सोयाबीन कापूस हळद ज्वारी या सारख्या पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी याच पावसाची आतुरतेने वाट पाहत होते आणि रात्रीपासून सकाळपर्यंत या पावसाने हजेरी लावली आहे

Hingoli Rain News :जिल्ह्यात रात्री पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला पाऊस पिकांना फायदेशीर  

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील अनेक पिके वाळत होती. परंतु रात्रीच्या पावसाने पिकांना नवचैतन्य मिळाले आहे. सोयाबीन कापूस हळद ज्वारी या सारख्या पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी याच पावसाची आतुरतेने वाट पाहत होते आणि रात्रीपासून सकाळपर्यंत या पावसाने हजेरी लावली आहे

Amit Shah Mumbai Visit : थोड्याच वेळात अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतील

Amit Shah Mumbai Visit : थोड्याच वेळात अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतील. त्यापूर्वी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी लालबागच्या राजाच्या मंडपात उपस्थिती लावली आहे. विनोद तावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी लालबागमध्ये पोहोचले आहेत. 

Amit Shah Mumbai Visit : गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव; मुंबई दौऱ्यावर असणाऱ्या अमित शाहांचं मराठी ट्वीट

Amit Shah Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मुंबईतील काही मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेणार आहेत. यासंदर्भात अमित शाहांनी एक ट्वीट केलं आहे. विशेष म्हणजे, अमित शाह यांनी हे ट्वीट मराठीत केलं आहे. 





Amit Shah Mumbai Visit : लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शाह वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेणार

Amit Shah Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. 


 


 

Amit Shah Mumbai Visit : भाजप नेत्यांची कोअर कमिटी बैठक आज संध्याकाळी होणार

Amit Shah Mumbai Visit : अमित शाह मुंबई दौऱ्यावर असून भाजप नेत्यांची कोअर कमिटी बैठकही पार पडणार आहे. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीच्या वेळेत आणि स्थानात बदल करण्यात आला आहे. प्रदेश कोअर टीम बैठक आज संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. एयरपोर्ट येथील सेरेमोनियल लाऊंज मध्ये ही बैठक होणार आहे. 

CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार नाहीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार नाहीत. अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार होते

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार, हाजी अली परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार, हाजी अली परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त

Amit Shah at Mumbai : मुंबई दौऱ्यावेळी अमित शाह भाजप नेत्यांशी खलबतं करणार, भाजप आणि शिंदे गटाला मोठा कानमंत्र देणार

Amit Shah at Mumbai : काल मुंबईत दाखल झालेले केंद्रीय गृहमंत्री थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रवाना होणार आहेत. अमित शाहांच्या दौऱ्यानिमित्त लालबागमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाबरोबरच अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचं दर्शन घेतील. मात्र अमित शाहांच्या दौऱ्यात गणेशभक्ती बरोबरच राजकीय शक्तीचं देखील दर्शन होणार आहे. कारण अमित शाह हे भाजप नेत्यांशी खलबतं करणार असल्याचं कळतंय. मुंबई महापालिका निवडणुका कधीही जाहीर होतील. आणि त्या अनुषंगानं अमित शाह भाजप आणि शिंदे गटाला मोठा कानमंत्र देणार आहेत.

Amit Shah On Mumbai Visit : लालबाग परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली

Amit Shah On Mumbai Visit : लालबाग परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. 


क्यूआरटी, आरएएफ, मुंबई पोलिसांचा लालबागच्या राजाच्या उत्सव मंडळाजवळ दाखल 


बॅरिकेटिंग वाढवण्यात आली असून गाडी थेट मुख्य कमानीपर्यंत येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे 


स्पेशल ब्रांचचे अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, सोबतच काही अधिकारी देखील तैनात 


सोबतच इतर यंत्रणा देखील कार्यरत आहेत. 


200 हून अधिक मुंबई पोलिसांचे कर्मचारी लालबागच्या परिसरात तैनात

Amit Shah On Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, लालबागमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात

Amit Shah On Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर असून आज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते लालबागला जाणार आहेत. त्यानिमित्तानं लालबागमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. क्यूआरटी, आरएएफ, मुंबई पोलीस लालबागच्या राजाच्या उत्सव मंडळाजवळ दाखल झाले आहेत. बॅरिकेटिंग वाढवण्यात आली असून गाडी थेट मुख्य कमानीपर्यंत येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच इतर यंत्रणा देखील कार्यरत आहेत. आरएफ म्हणजे रॅपीड ॲक्शन फोर्स दाखल झाली आहे. 

Amit Shah On Mumbai Visit : कसा असेल अमित शाह यांचा मुंबई दौरा?

  • सकाळी 9 वाजता : अमित शाह दिग्दर्शक रोहित शेट्टीची भेट घेणार आहेत.

  • सकाळी 10 वाजता : सह्याद्री गेस्ट हाऊसवरुन लालबागकडे रवाना होतील. 

  • सकाळी 10.30 वाजता : अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतील. 

  • सकाळी 11 वाजता : लालबागचा राजाहून वांद्राकडे प्रयाण.

  • सकाळी 11.15 वाजता : वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देतील

  • दुपारी 12 वाजता : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेट. इथे भाजप पदाधिकारी बैठक आणि त्यानंतर स्नेहभोजन असेल.

  • दुपारी 2 वाजता : सागर बंगल्याहून वर्षा बंगल्याकडे निघणार.

  • दुपारी 2.15 वाजता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट.

  • दुपारी 3.35 वाजता : नायक चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम.

  • संध्याकाळी 5.50 वाजता : मुंबई विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण

Amit Shah On Mumbai Visit : कधी आणि कुठे होणार वाहतूकीवर परिणाम?

कधी आणि कुठे होणार वाहतूकीवर परिणाम? 



  • रविवारी 4 सप्टेंबर रोजी सहार, वांद्रे, वरळी सी लिंक, हाजीअली, केम्स कॉर्नर, बाबुलनाथ आणि मलबार हिल परिसरात वाहतूक संथ होणार आहे. 

  • सोमवार, 5 सप्टेंबर रोजी मलबार हिल, बाबुलनाथ, केम्स कॉर्नर, हाजीअली, महालक्ष्मी रेस कोर्स, सात रस्ता, चिंचपोकळी जंक्शन आणि लालबाग परळ, लोटस जंक्शन, वरळी डेअरी, सी लिंक, लिलावती जंक्शन परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु असणार आहे. तसेच, मलबार हिल, गिरगाव चौपाटी, मरिन लाईन्स आणि रिगल जंक्शन कुलाबा परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु राहिल. त्याचप्रमाणे मरोळ ते पवई दरम्यानच्या परिसरातही वाहतूक संथ होणार आहे. 

Amit Shah On Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल

Amit Shah On Mumbai Visit : अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेतही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. अतिमहत्वाची व्यक्तीच्या पुर्व नियोजीत भेटी दरम्यान 4 आणि 5 सप्टेंबर, 2022 रोजी काही भागांतील रस्त्यांवरील वाहतूक संथ राहील, अशी माहिती मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून देण्यात आली आहे.


सोमवारी 5 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यांमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मुंबईतील काही भागातील रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने होईल, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. 

Amit Shah On Mumbai Visit : अमित शाह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार?

Amit Shah On Mumbai Visit : मुंबई दौऱ्यावेळी अमित शाह अनेक महत्त्वाच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांनी आधीपासूनच जोर धरला आहे. त्यामुळे अमित शाह राज ठाकरेंची भेट घेणार का? याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 

Amit Shah On Mumbai Visit : मुंबई दौऱ्यावेळी अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणार

Amit Shah On Mumbai Visit : अमित शाह काल (रविवारी) मुंबईत दाखल झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महत्त्वाच्या बैठका घेणार असल्याची माहिती आहे. आज सकाळी साडे दहा वाजता ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत. बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते त्यांच्या नियोजित बैठकांना उपस्थित राहतील.   

Amit Shah On Mumbai Visit : अमित शाहांचा मुंबई दौरा; लालबागच्या राजासह काही मंडळांत गणेश दर्शनासाठी उपस्थिती

Amit Shah On Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर आहेत. काल (रविवारी) संध्याकाळी ते मुंबईत (Mumbai) दाखल झाले. या दौऱ्यात ते लालबागचा राजाचे (Lalbaugcha Raja 2022) दर्शन घेतील. आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या घरी भोजन आणि बैठकीसाठी जातील.-तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या सार्वजनिक मंडळालाही ते भेट देणार आहेत. याशिवाय अमित शाह यांचा मुंबई दौरा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याची अवघ्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Amit Shah Mumbai Visit LIVE Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर आहेत. काल (रविवारी) संध्याकाळी ते मुंबईत (Mumbai) दाखल झाले. या दौऱ्यात ते लालबागचा राजाचे (Lalbaugcha Raja 2022) दर्शन घेतील. आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या घरी भोजन आणि बैठकीसाठी जातील.-तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या सार्वजनिक मंडळालाही ते भेट देणार आहेत. याशिवाय अमित शाह यांचा मुंबई दौरा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याची अवघ्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 


अमित शाह काल (रविवारी) मुंबईत दाखल झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महत्त्वाच्या बैठका घेणार असल्याची माहिती आहे. आज सकाळी साडे दहा वाजता ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत. बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते त्यांच्या नियोजित बैठकांना उपस्थित राहतील.   


मुंबई दौऱ्यावेळी अमित शाह अनेक महत्त्वाच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांनी आधीपासूनच जोर धरला आहे. त्यामुळे अमित शाह राज ठाकरेंची भेट घेणार का? याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल


अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेतही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. अतिमहत्वाची व्यक्तीच्या पुर्व नियोजीत भेटी दरम्यान 4 आणि 5 सप्टेंबर, 2022 रोजी काही भागांतील रस्त्यांवरील वाहतूक संथ राहील, अशी माहिती मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून देण्यात आली आहे.


सोमवारी 5 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यांमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मुंबईतील काही भागातील रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने होईल, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. 


कधी आणि कुठे होणार वाहतूकीवर परिणाम? 


रविवारी 4 सप्टेंबर रोजी सहार, वांद्रे, वरळी सी लिंक, हाजीअली, केम्स कॉर्नर, बाबुलनाथ आणि मलबार हिल परिसरात वाहतूक संथ होणार आहे. 
सोमवार, 5 सप्टेंबर रोजी मलबार हिल, बाबुलनाथ, केम्स कॉर्नर, हाजीअली, महालक्ष्मी रेस कोर्स, सात रस्ता, चिंचपोकळी जंक्शन आणि लालबाग परळ, लोटस जंक्शन, वरळी डेअरी, सी लिंक, लिलावती जंक्शन परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु असणार आहे. तसेच, मलबार हिल, गिरगाव चौपाटी, मरिन लाईन्स आणि रिगल जंक्शन कुलाबा परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु राहिल. त्याचप्रमाणे मरोळ ते पवई दरम्यानच्या परिसरातही वाहतूक संथ होणार आहे. 
कसा असेल अमित शाह यांचा मुंबई दौरा? 


सकाळी 9 वाजता : अमित शाह दिग्दर्शक रोहित शेट्टीची भेट घेणार आहेत.
सकाळी 10 वाजता : सह्याद्री गेस्ट हाऊसवरुन लालबागकडे रवाना होतील. 
सकाळी 10.30 वाजता : अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतील. 
सकाळी 11 वाजता : लालबागचा राजाहून वांद्राकडे प्रयाण.
सकाळी 11.15 वाजता : वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देतील
दुपारी 12 वाजता : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेट. इथे भाजप पदाधिकारी बैठक आणि त्यानंतर स्नेहभोजन असेल.
दुपारी 2 वाजता : सागर बंगल्याहून वर्षा बंगल्याकडे निघणार.
दुपारी 2.15 वाजता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट.
दुपारी 3.35 वाजता : नायक चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम.
संध्याकाळी 5.50 वाजता : मुंबई विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.