कल्याण : जवळपास 195 देशांच्या राष्ट्रध्वज लक्षात ठेवणे खरचं कठीण आहे. पण ही किमया साधलीय ती अंबरनाथच्या एका पाच वर्षीय चिमुकल्याने. इतकंच नव्हे तर अवघ्यां 1 मिनटं 29 सेकंदात 54 देशांचा राजधान्यांची नावे देखील त्याने सांगितली. सुहृद बोडसच असं या चिमुकल्याचं नाव आहे. त्याच्या अफाट समरणशक्तीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने देखील घेतलीय. तर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने त्याला सुपर टॅलेंटेड कीडचा किताब बहाल केला.


अंबरनाथ पूर्व भागातील कानसई परिसरात राहणारा सुहृद बोडस हा चिमुकल्याला खेळण्याच्या धावण्या, पळण्याच्या वयातच जगभरातील 195 देशांचे राष्ट्रध्वज लक्षात आहेत. फक्त देशाचा राष्ट्रध्वज नव्हे तर 54 देशांच्या राजधान्याही त्याच्या तोंडपाठ आहेत. त्याच्या या अफाट बुद्धीमत्तेची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. सुहृद बोडस याचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सामाविष्ट करण्यात आलं आहे. यात इंटरनॅशनल बुक आणि ब्रिटिश कॉमन वेल्थ ऑफ नॅशनल यामध्ये जगातील 54 देशांचा समावेश असतो. या सर्व देशांच्या राजधान्या सुहृदने अगदी कमी वेळात म्हणजेच 1 मिनट 29 सेकंदात सांगितल्या असून एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे.


सिद्धार्थ आणि श्वेता यांचा सुहृद हा एकुलता एक मुलगा आहे. श्वेता या संस्कृत शिक्षिका आहेत तर सिद्धार्थ हे सीए आहेत. श्वेता यांनी सुरुवातीला सुहृदला संस्कृतचे काही श्लोक शिकवले. त्याने पटकन आत्मसात केले. त्याची क्षमता पाहून त्याच्या वडिलांनी आणि आईने शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून सुहृद मोबाईलमध्ये विविध देश, त्यांची राजधानी, त्यांचे ध्वज यांची माहिती दाखवली त्याचे चार्ट घरात आणले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्याला ते परत दाखवण्यात आले. तेव्हा सुहृद न चुकता देश, राजधानी आणि ध्वज ओळखले. आपल्या मुलाचे नावे जागतिक विक्रम झालाय हे पाहूनच खूप अभिमान वाटतोय अस त्यांनी सांगितले.