ठाणे :  अंबरनाथमध्ये काळीज पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची गळा चिरून हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीये. (Latets Marathi News) पती पत्नीच्या (Husband- Wife) नात्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असात. यामध्ये एकमेकांवर असलेला विश्वास या नात्याला अधिक घट्ट करतो. विश्वास नसल्यास त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. अन् त्याचा दुर्दैवी शेवट होतो. अंबरनाथमधील  या घटनेत देखील नात्यात विश्वास नसल्यानं मोठा घात झाला आहे. 


अंबरनाथमधील  पालेगाव परिसरातील एका रहिवासी संकुलात मंगळवारी ही घटना घडली.  पत्नीची हत्या केल्यावर पती तेथून पसार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे या दाम्पत्याच्या एक वर्षाच्या चिमुकलीचं मायेचं छत्र मात्र हरपलं आहे.


वर्षाच्या चिमुकलीचं मायेचं छत्र मात्र हरपलं


 मिळालेल्या माहितीनुसार,  पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत विकी लोंढे हा पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होता. या दोघांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला असून त्यांना एक वर्षाची मुलगी देखील आहे. या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून सतत वाद होत होते. याच वादातून मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास विकी याने त्याच्या पत्नीवर चाकूने वार करत गळा चिरून तिची हत्या केली आणि घरातून पसार झाला. याबाबत रात्रीच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.


आरोपीच्या शोधासाठी  दोन पोलीस पथक रवाना


 शिवाजीनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. प्रथमदर्शनी चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.  पतीने कोणत्या  कारणावरुन पतीची हत्या केली हे अद्याप समोर आलेले नाही. आरोपीच्या शोधीसाठी  पथक रवाना झाले आहे.  या घटनेनंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला आहे. तर आरोपी विकी लोंढे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना झाल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.