मुंबई : सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपची युती होणे आवश्यक असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होते.
शिवसेना-भाजपची आगामी निवडणुकांमध्ये युती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मतांचं विभाजन टाळण्यासाठी शिवसेना आणि भाजप पक्षाला एकत्र यावं लागेल. भाजप शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांच्याशी आपण कायम संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वतंत्र व्हाव्यात अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. शिवाय या दोन्ही निवडणुकांसाठीची युती आधीच जाहीर करुन टाकण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
मराहाष्ट्राच्या राजकाणात शिवसेना मोठा पक्ष होता, मात्र 2014 नंतर भाजप मोठा पक्ष ठरला. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा कोणताही अंजेडा भाजपचा नाही. किंबहुना प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन चालण्याचं काम भाजपनं केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
हे सरकार युतीनं नाही, तर केवळ भाजप
एकीकडे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस युती होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत, मात्र शिवसेना सातत्यानं स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत. 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी आगामी निवडणुका भाजपसोबत न लढता, स्वबळावरच लढणार असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच हे सरकार युतीनं नाही, तर केवळ भाजपचं असल्याचा दावाही रावतेंनी केला.