मुंबई : जुहूच्या एसएनडीटी हॉस्टेलमधील महिला वॉर्डनवर एका विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


एसएनडीटीच्या हॉस्टेल परिसरात मुलींना तोकडे कपडे परिधान करण्यास परवानगी नाही. मात्र एका विद्यार्थिनीच्या शरीरावर व्रण आल्याने डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तिने स्लिवलेस कपडे परिधान केले होते. नियमभंग केला म्हणून हॉस्टेलच्या वार्डनने जाब विचारला आणि अंगावरील रॅशेस दाखव म्हणून कपडे काढायला लावले असा आरोप संबंधित विद्यार्थिनिने केला आगे.


संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जवळपास 400 विद्यार्थिनीने याविरोधात आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत या वॉर्डनला हॉस्टेलमधून काढलं जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा विद्यार्थिंनींनी दिला.


मुलींच्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने वॉर्डनवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. वॉर्डनने आपल्याला कपडे काढण्यास सांगितल्याची तक्रार एका विद्यर्थिनीने केली आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार विद्यापीठ प्रशासन याबाबत चौकश करत आहे आणि वॉर्डन दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन एसएनडीटी कॉलेजचे प्रभारी कुलगुरू राजेश वानखेडे यांनी दिलं.