शिवसेना-भाजपच्या युतीसंदर्भातील चर्चांचे सर्व अपडेट तुम्हाला इथे मिळतील :
Update (01.45 PM) : नोटाबंदीच्या डेडलाईन हुकल्या, मग युतीच्या चर्चेस डेडलाईन का?, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. तसंच युतीबाबत अद्याप ठोस प्रस्ताव आलेला नसल्याचंही उद्धव यांनी स्पष्ट केलं. ठाणे महापालिकेत सत्तेत आल्यावर कोणती कामं करणार आहोत, याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
Update (11.13 AM) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थिती रात्री बैठक पार पडली. ‘युतीसंदर्भातील निर्णयात मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत’, असा निर्णय वारंवार फिसकटणाऱ्या बैठकींनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.
संबंधित बातम्या :