मनसेच्या पालिका शिक्षक संघटनेतले सर्व 1100 सदस्य शिवसेनेत
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2016 09:56 PM (IST)
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसेच्या पालिका शिक्षक संघटनेच्या सर्वच्या सर्व 1100 सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सर्वच सदस्यांनी शिवसेनेचा रस्ता धरल्यामुळे मनसेची पालिकेतील शिक्षक सेना बरखास्त झाली आहे. मनसेत कोणतीच कामं होत नाही, त्यामुळे तिथे राहण्यात काहीच उपयोग नसल्याचा आरोप या सदस्यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला. शिवसेनेचे मंगेश सातमकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष के. पी. नाईक, विलास क्षीरसागर, जेपी सिंह, प्रकाश चव्हाण, शोभा हेगडे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.