कोलगेट, साबण, पॅराशूट तेल... हा घ्या पुरावा: अजित पवार
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2016 10:34 AM (IST)
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं आणि बनावट साहित्य पुरवलं जातं. याचे पुरावेच आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केले. गेल्या काही दिवसात आदिवासी विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं साहित्य पुरवल्याप्रकरणी विधानसभेत चर्चा सुरु होती. यावेळी अजित पवरांनी दंत मंजनापासून ते साबणापर्यंत बनावट साहित्य पुरविल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री नेहमी पुरावे द्या असं विरोधकांना म्हणतात. आता मुख्यमंत्र्यांनी पुरावा घ्यावा आणि कारवाई करावी अशी मागणी यावेळी अजित पवारांनी केली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या साहित्यामधील अनेक बनावट वस्तू असल्याचा दावा अजित पवारांनी केला. बनावट साबण, तेलाची बाटली, कोलगेट यासारख्या वस्तू अजित पवारांनी विधानसभेत दाखवल्या. अशा पद्धतीचे जर घोटाळे होत तर मुख्यमंत्र्यांनी त्वरीत कारवाई करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. VIDEO: