VIDEO : अजिंक्य रहाणेकडून मुंबईतील बीकेसीत साफसफाई
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2017 09:49 PM (IST)
मुंबईतील बीकेसी परिसरात अजिंक्यनं हातात झाडू घेऊन ही स्वच्छता मोहीम राबवली.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता हीच सेवा या अभियानात आज टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणेनं सहभाग घेतला. मुंबईतील बीकेसी परिसरात अजिंक्यनं हातात झाडू घेऊन ही स्वच्छता मोहीम राबवली. आपण आपलं घर जस स्वच्छ ठेवतो तसच आपण आपलं शहर आपला देश स्वच्छ ठेवलं पाहिजे. स्वच्छता ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असं सांगत रहाणेनं पंतप्रधानांच्या या मोहीमेच कौतुक केलं. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी अजिंक्य रहाणेसह देशातील विविध मान्यवरांना पत्राद्वारे या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं, पाहा व्हिडीओ –