Mumbai Air Quality Index : मुंबईकरांनी (Mumbai) जोरदार दिवाळी (Diwali 2023) साजरी केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Pujan) दिवशी 24 तासांत मुंबईत तब्बल 150 कोटी रुपयांचे फटाके फुटल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता (AQI) पातळी पुन्हा खालावली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी 288 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले आहेत. 


मुंबईकरांकडे दिवाळीत जोरदार आतषबाजी


महापालिका प्रशासनाचे आवाहन मुंबईकरांनी धुडकावले. रात्री 8 ते 10 पर्यंत फटाके फोडण्याबाबतच्या सूचना असतांनाही मध्यरात्रीनंतरही मुंबईत आतिषबाजी सुरु होती. लक्ष्मीपूजनानंतर मुंबईची हवा पुन्हा प्रदुषित झाली आहे. दिवाळीपूर्वी समाधानकारक श्रेणीत असलेला एअर क्वालिटी इंडेक्स पुन्हा खराब श्रेणीत आहे. मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स 259 वर पोहोचली आहे. इतर दिवसांपेक्षा 50 टक्क्याहून जास्त संख्येनं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. झोपडपट्टीपेक्षा जास्त फटाक्यांची आतिषबाजी उंच इमारतींच्या भागात पाहायला मिळाली.


मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली! 


गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हवेची पातळी दिवसेंदिवस खराब होताना दिसत आहे. त्यातच दिवाळीत फटाके फोडण्याचं प्रमाण वाढल्याने हवेची गुणवत्ता आणखी ढासळली आहे. दिवाळीपूर्वी अवकाळी पावसामुळे हवेतील धुलिकणांचं प्रमाण कमी झाल्याने हवेची पातळी किंचित सुधारली होती. पण, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुफान आतषबाजीमुळे हवेची पातळी पुन्हा खालावल्याचं चित्र दिसून येत आहे.


फटाक्यांची आतषबाजीचा फटका


मुंबईकरांनी दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करण्याचा आनंद घेतला. मुंबईसह आजूबाजूच्या शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांची आतषबाजी झाली. फटाके फोडण्याचं तुलनेनं प्रमाण कमी असलं तरी फटाके फोडण्याच्या वेळेसंबंधित निर्बंध नागरिकांनी धाब्यावर बसवले आहेत. फटाके फोडण्यासाठी रात्री 8 ते 10 ची वेळ आहे, पण संध्याकाळपासून फटाके फोडण्यास सुरु झाल्याचं दिसून आलं. मध्यरात्रीनंतरही अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. याचा परिणाम मुंबईतील हवेवर झाल्याचं दिसत आहे.


फटाक्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात वाढ


मुंबईसह मुंबई उपनगरात फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता काहीशी नियंत्रणात होती. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून बांधकामे स्थगित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे दिवाळी आधी मुंबईच्या हवेची पातळी काहीशी सुधारली होती. पण, आता दिवाळीमध्ये हवेची पातळी पुन्हा घसरली आहे.


दिल्लीची हवाही बिघडली


दिल्लीत दिवाळीनंतर AQI पुन्हा एकदा वाईट श्रेणीत पोहोचला आहे. पाटणा, बिहारमधील AQI अत्यंत वाईट श्रेणीत आहे. CPCB नुसार, येथे AQI 370 वर कायम आहे. एकीकडे धुक्याची चादर आणि दुसरीकडे वाढतं प्रदूषण असं चित्र येथे दिसत आहे. सोमवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये धुराचे लोट दिसून आले. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानंतर प्रदूषणाच्या पातळीत सुधारणा झाली होती, त्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीची हवा पुन्हा खराब झाली आहे. स्विस समूह IQAir नुसार, सोमवारी सकाळपर्यंत दिल्लीतील AQI 514 होता, ही अत्यंत गंभीर श्रेणी आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maharashtra Weather Update : राज्यात पुढील 24 तासांत अवकाळी बरसणार, 'या' जिल्ह्यात पावसाचा अंदाज