मुंबई : वादानंतर सुरु झालेल्या सुकाणू समितीमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. राजू शेट्टींच्या नेतृत्वात उद्या उच्चस्तरीय मंत्रिगटाची चर्चा करणार असं समितीनं जाहीर केल्यानंतर लगेच रघुनाथ पाटील यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. मंत्रिगटाशी चर्चा करायला फक्त निवडक सदस्य जाणार नाहीत तर सर्वच्या सर्व 35 सदस्य जातील असं रघुनाथ पाटलांनी सांगितलं.


मोठ्या मतभेदानंतर संध्याकाळी 4 वाजता सुकाणू समितीच्या बैठकीला आज शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात सुरुवात झाली. या बैठकीला प्रहार संघटनेने सर्वेसर्वा आणि सुकाणू समितीचे सदस्य बच्चू कडू हे अनुपस्थित होते. तर बैठकीकडे डॉ. गिरधर पाटील, अनिल घनवट, रामचंद्रबापू पाटील आणि डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी पाठ फिरवली होती.

या बैठकीवर सुकाणू समितीचे सदस्य डॉ. गिरधर पाटील यांनी टीकेची झोड उठवली आहे. बैठकीचं निमंत्रण सर्वांना देण्यात आलं. पण आपल्याला याची माहितीही दिली गेली नाही असं डॉ. पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

व्हिडीओ पाहा


संबंधित बातम्या

' मागण्या मान्य न झाल्यास मध्य प्रदेशप्रमाणे आंदोलन करु'