मुंबई : साडेआठ तासांच्या चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय)कार्यालयातून बाहेर पडले आहेत. कोहिनूर मिलप्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना आज सकाळी चौकशीसाठी बोलवले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी राज यांची साडेआठ तासांहून अधिक वेळ चौकशी केली. विशेष बाब म्हणजे उन्मेश जोशींपेक्षाही जास्त वेळ राज ठाकरेंची ईडीने चौकशी केली.

दरम्यान, याप्रकरणातील राज ठाकरे यांची चौकशी पूर्ण झाली असून, गरज पडली तरच राज यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कथित कोहिनूर स्क्वेअर घोटाळ्याप्रकरणी राज ठाकरेंवर कोणत्या प्रश्नांची सरबत्ती केली, त्या प्रश्नांना राज ठाकरेंनी काय उत्तरं दिली हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान राज ठाकरेंची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असताना त्यांचे कुटुंबिय आणि मनसे कार्यकर्ते दिवसभर ईडी कार्यालयाबाहेर उभे होते.

राज ठाकरेंच्या चौकशीतून काय बाहेर येणार? 



काय आहे प्रकरण?

काही वर्षांपूर्वी एनएमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत गेतली.

उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते.

उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिल होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.

VIDEO | 'लाव रे तो व्हीडिओ'मुळे राज ठाकरेंना नोटीस? | माझा विशेष

संबंधित बातम्या