मुंबई : मुंबईत हक्काचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर 'म्हाडा'ने आनंदाची बातमी दिली आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या 1384 घरांच्या लॉटरीसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आजपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.


म्हाडाच्या घरांसाठी 5 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजल्यापासून अर्ज भरता येणार आहेत. 10 डिसेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. तर 16 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता 1384 घरांसाठी सोडत निघणार आहे.

म्हाडाने या वर्षी घरांसाठी किमतीचे नवीन धोरण तयार केले आहे. त्यानुसार म्हाडाच्या घरांच्या किमती यंदा 25 ते 30 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. तरीही म्हाडाने यंदा सर्वाधिक किंमतीच्या सदनिकांचा विक्रम मोडीत काढला आहे.

मुंबईतील ग्रँट रोडमध्ये म्हाडाच्या एका घराची किंमत 5 कोटी 80 लाखांवर आहे. तर सर्वात स्वस्त घराची किंमत 14 लाख 62 हजार आहे.

एकूण सदनिका-1384

कुठे किती घर ?

अँटॉप हिल वडाळा 278

प्रतीक्षा नगर,सायन 89

गव्हाण पाडा, मुलुंड 269

पी एम जी पी मानखुर्द 316

सिद्धार्थ नगर गोरेगाव(पश्चिम) 24

महावीरनगर,कांदिवली(पश्चिम) 170

तुंगा,पवई 101

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा मार्फत प्राप्त सदनिका(मुंबई शहर) 50

विकास नियंत्रण विनियम 33(5)अंतर्गत प्राप्त सदनिका 19

विखुरलेल्या सदनिका 68