मुंबई : किरीट सोमय्यांनी दाखवलेले सातबारे हे सिक्रेट नाही, तर हे ओपन डॉक्युमेंट आहेत. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा आणि या व्यवहारांचा काहीही संबंध नाही. हे गुन्हेगार अर्णव गोस्वामी यांना का पाठीशी घालत आहेत? 5 मे 2018 ला अन्वय नाईक यांच्या मृतदेहाला जेव्हा आम्ही अग्नि दिला, त्यावेळी किरीट सोमय्या यांची बोबडी वळली होती का? असा सवाल आज्ञा नाईक यांनी किरीट सोमय्या यांना केला आहे.


यामध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोरलाई गावातील जमीन अन्वय नाईक, अक्षता नाईक, आज्ञा नाईक यांनी 21 प्लॉट रश्मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा रवींद्र वायकर यांना विकले असल्याचं कागदपत्रांवरून सिद्ध होत आहे. अन्वय नाईक, रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातील व्यवहार हे व्यावसायिक होते का? असा प्रश्न यावरून समोर येत आहे. त्यामुळे याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.


'खेळ आता सुरु झालाय...'; जामीनानंतर अर्णब गोस्वामी यांचा सरकारला थेट इशारा


किरीट सोमय्या यांचे आरोप म्हणजे जेवणातील पंगतीत लोणचं : नीलम गोऱ्हे


किरीट सोमय्या यांचे आरोप म्हणजे जेवणातील पंगतीत लोणचं वाढल्या सारखे आहे. त्यांच्याकडे फार महत्व द्यावसे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शपथ पत्रात या सगळ्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे यात काही नवीन नाही. ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी द्यावेत. पुढील महिनाभरात आणखीन पूरावे द्यावेत अन्यथा त्यांनी माफी मागावी, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
Kirit Somaiya | अन्वय नाईक - ठाकरे कुटुंबियात जमीन व्यवहार : किरीट सोमय्या