'आता पुन्हा चूक नको, कुलगुरु म्हणून एखादी लायक व्यक्ती नेमावी. कार्यप्रणाली सुधारा.' असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.
दरम्यान, यावेळी इतरही अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. 'कुलगुरु जबाबदारीतून मोकळे झाले पण ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, वर्ष वाया गेले, मनस्ताप झाला, सरकार याची भरपाई कशी करणार? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
तसेच ऑनलाईन असेसमेंटचा निर्णय हा घोटाळा असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंची अखेर हकालपट्टी!
मुंबई विद्यापीठाचा निकाल लावण्यासाठी झालेली दिरंगाई ही गंभीर विषय बनला होता. संजय देशमुख यांची हकालपट्टी केली जाईल, अशी यापूर्वीही चर्चा होती. मात्र अखेर राज्यपालांनी त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे.
संजय देशमुख यांना यापूर्वीच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. तेव्हाच त्यांची हकालपट्टी केली जाईल, असा अंदाज लावला जात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्यपाल यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीतही या विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावर चर्चा झाली होती.
मुंबई विद्यापीठाने निकालासाठी तीन ते चार वेळा डेडलाईन दिली होती. मात्र तरीही निकाल लावण्यात विद्यापीठ प्रशासनाला अपयश आलं. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
संबंधित बातम्या :
मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा गोंधळ आणि घटनाक्रम