मुंबई : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँलाही मानसिक छळाला सामोरं जावं लागलं होतं, असा गौप्यस्फोट खुद्द राधे माँ ने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून वादात राहिलेल्या राधे माँनं एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे.

इतकंच नाही, तर आपले मानसिक संतुलन ढळल्यामुळे आपण मानसोपचाराकडून उपचार घेत असल्याची कबुलीही राधे माँने दिली आहे.

‘माझं 17व्या वर्षी लग्न झालं. पण 4 वर्षानंतर माझे पती परदेशी गेले. त्यामुळे मी डिस्टर्ब झाली. त्यानंतर मी शिलाईचं काम सुरु केलं आणि देवपूजेत स्वत:ला गुंतवून घेतलं. सुरुवातीला माझ्या आईचे निधन झाले. त्यानंतर माझे पती परदेशी निघून गेले, या धक्क्यातून मी सावरु शकले नाही. त्यानंतर माझ्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करण्यात आले.’ असंही राधे माँने या मुलाखतीत सांगितलं.

एबीपी माझाच्या या मुलाखतीमध्ये राधे माँने आतापर्यंत अंधारात असलेल्या तिच्याबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

VIDEO :