माधवी जुवेकर बेस्टमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होत्या. चौकशी समितीने सात जणांना सेवेतून बडतर्फ केलं, तर पाच जणांची पदोन्नती रोखण्याची शिफारस केली आहे.
ऑन ड्युटी केलेला डान्स आणि पैसे उडवणं हा प्रकार निंदनीयच आहे. कारवाई केलेले कर्मचारी मध्यमवर्गीय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सौम्य कारवाई व्हावी, असे आदेश बेस्ट व्यवस्थापनाला देणार असल्याचं बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर म्हणाले.
काय आहे प्रकरण?
29 सप्टेंबर 2017 रोजी दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात माधवी जुवेकरसह बेस्टमधील काही कर्मचाऱ्यांनी नृत्य केलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला.
व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री माधवी जुवेकर तोंडात नोटा घेऊन नाचताना दिसत होती. तर बेस्टचे काही कर्मचारी हे माधवी आणि इतर महिला कर्मचाऱ्यांवर नोटा उधळताना दिसत होते.
दसऱ्याच्या निमित्ताने वडाळा डेपो मध्ये कसा धिंगाणा घातला गेला, अशी टीका या व्हिडिओवरुन झाली होती. एकीकडे बेस्टची आर्थिक परिस्थिती बेताची असताना अशा प्रकारे नोटा उधळल्याने सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केला होता.
उधळलेल्या नोटा ह्या खोट्या असल्याचा दावा अभिनेत्री माधवी जुवेकरने केला होता. लहान मुलांच्या खेळण्यातील म्हणजेच चिल्ड्रन बँकेच्या नोटा असल्याचं माधवीने म्हटलं होतं.
माधवी जुवेकर काय म्हणाली होती? (8 नोव्हेंबर 2017)
'दसऱ्याच्या निमित्ताने काही सांस्कृतिक कार्यक्रम वडाळा डेपोत सादर झाले. यावेळी देशभरातील विविध नृत्यशैली अशी संकल्पना घेण्यात आली होती. गरबा, जोगवा असे विविध नृत्यप्रकार कर्मचाऱ्यांनी सादर केले. कच्छी नृत्य करत असतानाचा हा व्हिडिओ आहे. या नृत्यात महिला तोंडात पैसे धरुन कमान करतात, त्याप्रमाणे आपण खोट्या नोटा तोंडात धरुन डान्स केला. कोणीतरी जाणूनबुजून बाकीची नृत्य वगळून केवळ आक्षेपार्ह वाटणारा भाग व्हायरल केला' असा दावा तिने केला होता.
माधवी जुवेकरची भूमिका असलेल्या फू बाई फू, गंध फुलांचा गेला सांगून, आपण यांना हसलात का? यासारख्या मालिका, तर बालक पालक, कांकण, गोष्ट छोटी डोंगराएवढी यासारखे चित्रपट गाजले आहेत.
व्हिडिओ : (8 नोव्हेंबर 2017)