नालासोपारा : स्फोटक प्रकरणात वैभव राऊतला अटक केल्यानंतर नालासोपाऱ्यात एटीएसने पुन्हा चौकशीचं सत्र सरु केले आहे. वैभव राऊतच्या संपर्कातील पाच ते सहा जणांची चौकशी करुन सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चौकशीतून एटीएसच्या हाती आणखी महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे.

वैभव राऊतने ज्यांच्याशी फोनवरुन संपर्क केला, त्यांना बोलवून एटीएसच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. वैभव राऊतच्या घराच्या आजूबाजूलाही एटीएसने तपास केला.

वैभव राऊतला अटक

9 ऑगस्ट 2018 च्या रात्री महाराष्ट्र एटीएसने नालासोपाऱ्यातील वैभव राऊतच्या घरी धाड टाकत, अनेक विघातक स्फोटकांचा साठा जप्त केला आणि वैभव राऊत यालाही अटक केली. त्यानंतर सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या अन्य दोघांनाही अटक करण्यात आली.

वैभव राऊतकडे काय काय सापडलं?

12 देशी बॉम्ब
2 जिलेटीन कांड्या
4 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर
22 नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर
सेफ्टी फ्यूज वायर
1500 ग्राम पांढरी पावडर
विषाच्या एक लिटरच्या दोन बाटल्या
6 व्होल्टच्या 10 बॅटरींचा बॉक्स
बॅटरी कनेक्टर
कन्व्हरसह अन्य साहित्य

प्रकरण काय आहे?

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) 9 ऑगस्टच्या रात्री नालासोपाऱ्यातील वैभव राऊत या व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली. भांडारअळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटकं जप्त केली. एटीएसला वैभव राऊतकडे स्फोटकं असल्याची टिप मिळाली होती. एटीएसने 9 ऑगस्टला रात्री ही धडक कारवाई केली. या धाडीत 8 देशी बॉम्ब मिळाले. तर घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या दुकानात बॉम्ब बनविण्यासाठी लागणारी सामुग्रीही मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये गन पावडर आणि डिटोनेटर यांचा समावेश आहे. या सामुग्रीमध्ये 2 डझन पेक्षा जास्त देशी बॉम्ब बनविले जातात. त्यानंतर याच प्रकरणात 11 ऑगस्ट रोजी वैभव, शरद आणि सुधन्वा यांच्या संपर्कात असणाऱ्या 12 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. राज्यातील विविध भागातून या 12 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली होती.

संबंधित बातम्या :


घरात स्फोटकं सापडलेला वैभव राऊत नेमका कोण?


माझा विशेष : 'स्फोटक' साधना करणाऱ्यांचे मास्टरमाईंड कोण?


स्पेशल रिपोर्ट : जयंत आठवले आणि ‘सनातन’चा इतिहास


EXCLUSIVE : गोवा : 'सनातन'च्या आश्रमात एबीपी माझा


वैभव राऊतला घेऊन ATS ची टीम पुन्हा नालासोपाऱ्यात दाखल


जप्त स्फोटकं मराठा मोर्चात घातपातासाठी होती: आव्हाड


महाराष्ट्रातल्या घातपाताचा कट एटीएसने उधळला


स्फोटकप्रकरणी आणखी दोघे अटकेत, ATS ची धडक कारवाई सुरुच