Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर रात्रीच्या सुमारास भीषण आपघात (Accident) घडला. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून, या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारीव (वय 31) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर चैतन्य  कासने (वय 24) , नशिर अली अबु अन्सारी (वय 33) , जयेश बाळाराम सपाट (वय 25) असे जखमींचे नावे आहेत. 


सुदैवाने कारमधील प्रवासी बचावले


मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा नजिक खडवली फाट्याजवळ कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने कार चारकाला मागच्या बाजूस जोरदार धडक दिली. त्यानंतर या कंटेनर चालकाने कारला फरफटत नेत रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आईस्क्रीमच्या टेम्पोला जोरदार धडक दिली. कंटेनर चालकाने फरफटत आणलेली कार आणि कंटेनर आईस्क्रीमच्या टेम्पोला धडकल्याने आईस्क्रीम खात उभे असलेले तीन ते चार जण दुचाकीसह चिरडले गेले. या भीषण अपघातात दोन ते तीन दुचाकी आणि एक कार आणि आईस्क्रीमच्या टेम्पोचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण या दुर्घटनेत गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारच्या मागच्या बाजूस कंटेनरची धडक बसल्याने सुदैवाने कारमधील प्रवासी बचावले आहेत. 


दरम्यान, या भीषण अपघातानंतर पळून गेलेल्या कंटेनर चालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या संदर्भात पडघा पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमकरता शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच या संपूर्ण घटनेची चौकशी पडघा पोलीस करीत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Dhule News : धुळ्यातील दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना अपघातांचा विळखा? चार वर्षांत 887 अपघात, तर 278 मृत्यू