Santa Cruz Fire : सांताक्रुजमधील (Santa Cruz) प्राइड ऑफ कलिना या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका रुमला आग (Fire) लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये नगीन लखु पटेल (वय 80) या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर मोठ्या शर्थीने अग्निशमाक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.


दरम्यान, प्राइड ऑफ कलिना या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग नेमकी कशामुळं लागली त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, मुंबईमध्ये सातत्यानं आगीच्या घटना घडत आहे. यामध्ये मोठं नुकसान होताना दिसत आहे.