नेरुळ पुलावर भीषण अपघात, मासे गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 06 Jul 2017 12:08 AM (IST)
नवी मुंबई: नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये काल पहाटे एका माशांनी भरलेल्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. मात्र, अपघातानंतर टेम्पोतल्या माशांचा रस्त्यावर खच पडला. हे मासे गोळा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. याचाच व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. टेम्पो, ट्रक, दुचाकी यांच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. याप्ररकणी नेरुळ पोलीस ठाण्यात सायन पनवेल टोल्वेज कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, माशाने भरलेल्या टेम्पोला अपघात झाल्याने माशांचा सडा रस्त्यावर पाहायला मिळाला. एकीकडे अपघातातील मृतदेह तर दुसरीकडे मासे गोळा करणारे लोक असं असंवेदनशील चित्र यावेळी पाहायला मिळालं. VIDEO: