मुंबई : मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित एसी लोकलची चाचणी मंगळवारपासून सुरु होणार आहे. कर्जत आणि खोपोलीदरम्यान ही चाचणी घेतली जाणार आहे.


चेन्नईच्या कारखान्यातून 5 एप्रिलला ही लोकल मुंबईत दाखल झाली होती. मात्र तेव्हापासून तिचा मुक्काम कुर्ला कारशेडमध्ये आहे. या एसी लोकलसाठी काही आवश्यक बदल करण्याची गरज होती. त्यानंतर आता या लोकलची चाचणी सुरु होणार आहे. सॉफ्टवेअरमधील बदल आणि जास्त उंची यामुळे एसी लोकल कुर्ला कारशेडमध्येच उभी आहे.

एसी लोकलच्या चाचणीला सुरुवात झाल्यामुळे लवकरच ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होण्याची चिन्हं आहेत. येत्या उन्हाळ्यात मुंबईकर गारेगार प्रवास करु शकणार आहेत.