मुंबई : मुंबईकरांचा प्रवास गारेगार करणारी एसी लोकल पहिल्यांदाच स्वतःच्या यंत्रणेसह रुळावर धावली. आतापर्यंत एसी लोकलची डिझेल इंजिनाच्या सहाय्याने चाचणी घेतली जायची. मात्र इतर लोकलप्रमाणे ओव्हरहेड-वायर संचलित इंजिनासह एसी लोकलची चाचणी घेण्यात आली.


अजून दोन महिन्यानंतर एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती आहे. सध्या एसी लोकलची कुर्ला कारशेडमध्ये चाचणी केली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता या एसी लोकलचे वेध लागले आहेत.

एसी लोकल कोणत्या मार्गावर धावणार?

एसी लोकल मध्य रेल्वेच्या कोणत्या मार्गावर धावणार, त्याबद्दल अजून कसलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र उंचीच्या कारणामुळे हार्बर लाईनच्या कुर्ला ते सीएसटी या मार्गावर ही लोकल धावण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे कुर्ला ते पनवेल किंवा ट्रान्सहार्बर मार्गावर ही लोकल धावण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडिओ :