माझा इफेक्ट : सांगलीतील अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक कॉलेजची चौकशी सुरु, चार पालकांचे जबाब नोंदवले, डॉ. कैलास सोलनकर आणि डॉ. मंगला जाधव यांच्या समितीकडून चौकशी

-------------------------------------------

हेडलाईन्स :

- एनडीटीव्ही इंडिया वृत्तवाहिनीवरील बंदी मागे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून बंदी मागे घेण्याचे आदेश : पीटीआय

- 'राहुल गांधींनी पक्षाची धुरा खांद्यावर घ्यावी', काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत नेत्यांची मागणी


पंढरपूर: मेडिकेअर रुग्णालयाच्या आयसीयूत तोडफोड, उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयावर दगडफेक

-----------------

पाकच्या गोळीबारात 2 भारतीय जवान शहीद, कोल्हापुरातील चंदगडच्या राजेंद्र तुपारेंना वीरमरण, आज संध्याकाळपर्यंत पार्थिव मूळगावी येणार

---------------

मुंबईत मराठा समाजाचा बाईकवर एल्गार, आरक्षणासाठी महिला आणि तरुणांची शिस्तबद्ध बाईक रॅली

---------------

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय राज्य मंत्री जयवंतीबेन मेहतांचं निधन, वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, आज मुंबईत अंत्यसंस्कार

-------------------

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर, काळा पैसा गुंतविल्याचा आरोप, नावाविषयी मात्र तर्कवितर्कांना उधाण

---------------

तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हत्याप्रकरणी 20 जणांवर मोक्का, मुख्य आरोपी श्याम दाभाडेसह 7 जण फरार

---------------

छट पूजेसाठी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर गर्दी, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय नेत्यांची हजेरी

---------------

मुंबईकरांची एसी लोकल इलेक्ट्रिफाईड इंजिनासह रुळावर, इतर लोकलप्रमाणे ओव्हरहेड वायरवर यशस्वी चाचणी

---------------

वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांचा श्वास गुदमरला, सरकारी शाळा, कार्यालयांना 3 दिवसांची सुट्टी जाहीर, प्रदूषण रोखण्यासाठी उच्च स्तरीय हालचालींना वेग