एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/08/2017


1.    नारायण राणेंच्या भाजपप्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी, सूत्रांची माहिती, 27 ऑगस्टला पक्षप्रवेशाची शक्यता https://goo.gl/cvFf6K , तर नितेश राणेंच्या व्हॉट्सअॅप डीपीमुळे चर्चांना उधाण https://goo.gl/GnwjGT

2.    ‘वंदे मातरम्’वरुन औरंगाबाद महापालिकेत जोरदार गोंधळ, ‘वंदे मातरम्’ सुरु असताना बसून राहिलेल्या एमआयएमच्या तिन्ही नगरसेवकांचं निलंबन https://goo.gl/szzZHJ

3.    कोल्हापुरात हॉकी प्रशिक्षकाकडून 4 अल्पवयीन मुलींचं लैगिंक शोषण, राजेंद्रनगरातील पब्लिक स्कूलमधील धक्कादायक प्रकार, राजाराम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल https://goo.gl/5h5XAc

4.    डीएसकेंनी 1200 कोटींचा घोटाळा केल्याचा खा. किरीट सोमय्यांचा आरोप, 2015 पासून 750 कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा न केल्याचाही दावा, मुख्यमंत्री, अर्थ मंत्रालयासह पीएफ आयुक्तांकडे तक्रार https://goo.gl/gp3w2a

5.    राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या पत्नीकडून ‘सह्याद्री’ अतिथीगृहाचा पाककृती स्पर्धेसाठी वापर, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींचा आरोप https://goo.gl/6zs5uw

6.    घर दुरुस्तीची परवानगी हवी असल्यास गाडी पार्किंगची जागा दाखवा, नवी मुंबई महापालिकेचा अजब फतवा https://goo.gl/J9e1p9

7.    विद्यार्थ्याला 6 तास गुडघ्यावर बसवून मारहाण, यवतमाळमधील वसंतराव नाईक मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग उघड https://goo.gl/txhav9

8.    शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेविका संध्या दोशींसह पतीवर गुन्हा, बंदुकीचा धाक दाखवल्याचा भाजप नगरसेविकेचा आरोप https://goo.gl/AWXmML

9.    पोटदुखीने त्रस्त पुरुषाच्या पोटात गर्भाशय असल्याचा अहवाल, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा भोंगळ कारभार https://goo.gl/ZT1NjZ

10.    नाशिक महापालिकेत करवाढीवरुन जोरदार राडा, शिवसेना नगरसेवकांकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्न, भाजपविरोधात विरोधक एकवटले https://goo.gl/yBSLBj

11.    नाशिकमध्ये दुचाकीच्या भीषण अपघातात पीएसआय रमेश साळींचा जागीच मृत्यू, टाकळी रोड परिसरातील घटना https://goo.gl/AbiMbW

12.    विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन, नागपूरसह अमरावती, वर्धा, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, अकोल्यात पावसाची दमदार हजेरी, मराठवाड्यातही रिमझिम https://goo.gl/vcWvyL

13.    मुंबईत मध्य रेल्वेवर उद्या विशेष ब्लॉक, ठाकुर्ली पुलाच्या कामामुळे तीन तासांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद, डेक्कन क्वीनसह अनेक एक्स्प्रेसही रद्द https://goo.gl/nHG8JZ

14.    राजधानी दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये महिलेसोबत गैरवर्तन, महिला स्टाफचा पदर खेचताना हॉटेलचा सिक्युरिटी मॅनेजर सीसीटीव्हीत कैद https://goo.gl/yVoK46

15.    स्मृती इराणींचा इगो दुखावल्याने मला सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन बाजूला सारलं, पहलाज निहलानी यांचा गंभीर आरोप https://goo.gl/noYqoZ

माझा कट्टा : संवेदनशील अभिनेते सयाजी शिंदे यांच्याशी दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता, फक्त @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर