*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन, मुंबई पाऊस अपडेट*  *(29/08/2017 : 2.30 PM)*

  1. मुंबईतील पावसाचा जोर अजूनही कायम, अनेक ठिकाणी गुडघाभर साचलेलं पाणी कमरेपर्यंत वाढलं, तीनही रेल्वे मार्ग ठप्प, NDRF ची पथकं पुण्यावरुन मुंबईकडे रवाना https://gl/bBNaeP


 

  1. मुंबईत गेल्या तासाभरात 70 मिमी तर सकाळी 8.30 पासून 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद, केईएम रुग्णालयात पाणी शिरलं https://goo.gl/tscndK


 

  1. दादर टीटी, हिंदमाता परिसरात गळ्यापर्यंत पाणी, तर फूल मार्केटमध्ये पावसाच्या पाण्यात हार-फुले तरंगली, तुफान पावसाने अनेक कार्यालयांना सुट्टी, मात्र रेल्वेच नसल्याने घरी जाण्याची पंचाईत https://gl/bBNaeP 


 

  1. बस अर्ध्या बुडाल्या तिथे टॅक्सी किंवा अन्य वाहने काय धावणार? मुंबईकरांसमोर प्रश्न, अनेक जण विविध स्टेशनवर जिथल्या तिथे अडकले https://gl/bBNaeP


 

  1. महापालिकेच्या शाळांना सुट्टी, डब्बेवाल्यांची सेवा खंडीत, रस्त्यावर अडकला असाल तर 100 नंबरशी संपर्क साधा, मुंबई पोलिसांचं आवाहन, तर मनपाकडून 1916 हेल्पलाईन नंबर जारी https://goo.gl/tscndK


 

  1. पाणी साचलेल्या परिसरातील गणेश मंडळांचा वीजपुरवठा खंडीत करा, दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीच्या सूचना,अत्यंत गरजेचं असेल तरच घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन https://goo.gl/tscndK  


 


*मुंबईतील कोणत्या रस्त्याची काय परिस्थिती, इथे पाहा* https://goo.gl/zXZVf1 *

 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*