एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/04/2018
1. सलमान खानला अखेर जामीन मंजूर, जोधपूर कोर्टाचा निर्णय, सलमान खान मुंबईच्या दिशेने रवाना, 7 मे रोजी पुन्हा जोधपूर कोर्टात हजर राहावं लागणार https://goo.gl/L6Bs9p
2. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती झाल्यास मी भाजपमध्ये नसेन, खासदार नारायण राणेंचं माझा कट्ट्यावर स्पष्टीकरण https://goo.gl/p8W7av
3. उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील प्रकल्पांचं उद्घाटन टाळलं, विश्वासात न घेतल्याचं ठाणे पालिका आयुक्तांवर खापर, सोहळा पुढे ढकलला https://goo.gl/okmqc1
4. सहा महिन्यात भाजपची भाषा बदलली, त्यांचा आत्मविश्वास डळमळला, शिवसेना नेते सुभाष देसाईंकडून स्वबळाचा पुनरुच्चार https://goo.gl/EHYUx8
5. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे, दिवस बदलायला वेळ लागणार नाही, राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा https://goo.gl/gk3x4Q
6. नाशिक मनपा पोटनिवडणुकीत मनसेची बाजी https://goo.gl/ufBHRi, सायन पोटनिवडणुकीत शिवसेनेने गड राखला https://goo.gl/ceWKzH पुण्यात मनपा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय, चंचला कोद्रेंच्या जाऊबाई जिंकल्या! https://goo.gl/8V7F1w
7. सांगलीत कृष्णेच्या पात्रात पोहोणाऱ्यांची फे-फे, 18 फुटी मगरीच्या भीतीनं पळता भुई थोडी, मगरीला वेळीच हुसकावल्याने 70 जणांचा जीव वाचला https://goo.gl/vNB9aD
8. नाशिकमध्ये माथेफिरुचा दोघांवर कुऱ्हाडीसह दगडाने हल्ला, हल्ल्यात दोघांचाही मृत्यू, संतप्त जमावाने माथेफिरुलाही संपवलं https://goo.gl/rWV4K7
9. सांगलीत एकतर्फी प्रेमातून नववीतील विद्यार्थिनीच्या गळ्यावर ब्लेडने वार, आरोपीने स्वतःचीही नस कापली, दोघेही गंभीर जखमी https://goo.gl/3Ko6xB
10. पुण्यात 65 वर्षीय नागरिकाची 35 वर्षीय महिलेकडून फसवणूक, लग्न करुन पैसे आणि फ्लॅटही बळकावला, महिलेसह तिघेजण अटकेत https://goo.gl/fy7mtd
11. मध्यरात्री घरात घुसून अतिप्रसंग, महिलेची इमारतीवरुन उडी, पिंपरी चिंचवडमधील रहाटणीत खळबळजनक घटना https://goo.gl/sK5TEZ
12. कपिल शर्माची पत्रकार विकी लालवाणींना ट्विटर आणि फोनवरुन अश्लिल शिवीगाळ, त्याच्याच विरोधात पोलीस तक्रार, नकारात्मक बातम्या छापल्याचा राग https://goo.gl/WTqMBb
13. कास्टिंग काऊचविरुद्ध हैदराबादमध्ये अभिनेत्रीचं भररस्त्यात टॉपलेस आंदोलन, अभिनेत्री श्री रेड्डीच्या निदर्शनांमुळे सिनेक्षेत्रातील काळं सत्य समोर https://goo.gl/wFRAhS
14. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोनदा वाजली भारतीय राष्ट्रगीताची धून, सतीशकुमार शिवलिंगम आणि वेंकट राहुल रगालाला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकाचा मान https://goo.gl/qxJo6s
15. आयपीएलच्या अकराव्या मोसमाचा थरार आजपासून, फॉरमॅट जुना, संघबांधणी नवी, सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स आमनेसामने https://goo.gl/SBs76F
SPECIAL : आरोग्य दिन विशेष : घरच्या घरी तयार करता येणाऱ्या 5 हेल्थ ड्रिंक्सच्या झटपट रेसिपी https://goo.gl/qxubq5
BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा ब्लॉग – ‘नाट्यसंमेलन : भले ते घडो’ https://goo.gl/Q1AW2R
माझा कट्टा : राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्याशी दिलखुलास गप्पा, पाहा रात्री 9 वाजता माझा कट्टा एबीपी माझावर
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा