एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 31/05/2018
1. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित 29 हजार मताधिक्याने विजयी, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा पराभूत https://goo.gl/av8MJ2
2. यापुढे कोणत्याही निवडणुकीत युती नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार, निवडणूक यंत्रणा भ्रष्ट असल्याचाही आरोप https://goo.gl/mZor3z
3. पालघर पोटनिवडणुकीच्या निकालावर शिवसेनेचा आक्षेप, मतमोजणीच्या आकडेवारीत तफावतीचा आरोप, 80-90 हजार मतं कुठून आली? एकनाथ शिंदेंचा सवाल http://abpmajha.abplive.in/
4. हार-पराजय महत्त्वाचा नव्हता, बाबांचं कार्य पुढे न्यायचं होतं, पालघर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांची प्रतिक्रिया, 2019 ची निवडणूक जिंकण्याचाही विश्वास https://goo.gl/dtni49
5. मोदी लाटेत जिंकलेली जागा भाजपने गमावली, भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडेंची बाजी, भाजपच्या हेमंत पटलेंचा 40 हजार मतांनी पराभव https://goo.gl/GzsX4D
6. उत्तर प्रदेशातील कैरानात योगी आदित्यनाथांना मोठा धक्का, रालोदच्या तबस्सुम खान विजयी, तर नागालँडमध्ये एनडीपीपीची बाजी http://abpmajha.abplive.in/
7. अहमदनगरच्या चौंडीत अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ, धनगर आरक्षणाची मागणी, राम शिंदेंच्या भाषणादरम्यान खुर्च्या फेकल्या https://goo.gl/s2yNzo
8. राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचं निधन, ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणज्योत मालवली, उद्या अंत्यसंस्कार https://goo.gl/F6kknJ
9. राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, औरंगाबाद कचरा प्रश्नी सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या यशस्वी यादवांची मुंबईच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली https://goo.gl/ZbRnd9
10. हृदयविकारामुळे रुग्णाचा मृत्यू, मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलची रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली https://goo.gl/Jm2KJR
11. पर्यटकांनो, इथे येऊ नका, तहानलेल्या शिमलावासियांची सोशल मीडियाद्वारे विनंती, अभूतपूर्व पाणी संकटामुळे मंत्र्यांना टँकरमधून होणारा पाणीपुरवठा बंद, इमारतींचं बांधकामही रोखलं https://goo.gl/adLRsK
12. मान्सून वेळेवर दाखल होणार, पर्जन्यमानही दिलासादायक, मृग नक्षत्राची सुरुवातही चांगली, सोलापूरचे पंचांगकर्ते मोहनराव दाते यांचं भाकित https://goo.gl/vjdWZ5
13. सलग 16 दिवस इंधनदरवाढीनंतर आता वाहनचालकांना किंचित दिलासा, पेट्रोलचे दर 7 पैसे, तर डिझेलचे दर 5 पैशांनी कपात https://goo.gl/JxipZ4
14. पत्नीला वर्णावरुन हिणवणं महागात पडणार, पतीने 'काळी कुळकुळीत' म्हटल्याने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून महिलेला घटस्फोट घेण्यास परवानगी https://goo.gl/RgKT3p
15. प्रेयसीसोबत लग्न न झाल्याने निराश, बीएसएफ जवानांच्या गोळ्या झेलण्यासाठी पाकिस्तानी तरुणाची भारतीय सीमेवर चाल, मात्र मोहम्मद आसिफची तुरुंगात रवानगी https://goo.gl/ctLzuF
माझा विशेष : पालघर आणि भंडारा-गोंदिया निवडणुकीचा अर्थ आणि अन्वयार्थ, पाहा रात्री 8 वाजता एबीपी माझावर...
BLOG : एबीपी न्यूजचे संपादक पंकज झा यांचा ब्लॉग - नवीनबाबू... राजकारणातल्या टायमिंगचा 'नायक' https://goo.gl/fahmGd
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा