एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/03/2018


1. देशभरात होळीचा सण उत्साहात, सीमेवर भारतीय जवानांकडून रंगांची  उधळण, राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून देशवासियांना शुभेच्छा https://goo.gl/Xj9yDD

2. होळीनिमित्त मुंबईसह राज्यभरात पोलिसांची करडी नजर, ठिकठिकाणी नाकाबंदी, सणवार विसरुन 24 तास जनतेच्या सेवेत असणारे पोलिस होळीच्या रंगात  http://abpmajha.abplive.in/

3. सलगच्या सुट्ट्यांमुळे गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जॅम, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी https://goo.gl/rW87aj

4. सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रेंची हत्या करुन आधी तुकडे केले, मग अभय कुरुंदकरच्या फ्रीजमध्ये ठेवले, नंतर खाडीत फेकले, चौकशीत नवी माहिती समोर https://goo.gl/LjDgGh

5. राजकीय धुळवडीत सर्व वाईट गोष्टींची आहुती देऊन शिवसेनेचे रंग उधळणार, आमदार अनिल परब यांचा एल्गार, परबांची शिवसैनिकांसोबत पर्यावरणपूरक होळी http://abpmajha.abplive.in/

6. भाजपकडून नारायण राणे यांचं पुनर्वसन, राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत मुंबईतल्या बैठकीत निर्णय; प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान यांचंही नाव, सूत्रांची माहिती https://goo.gl/uR4rfy

7. 2016 मध्ये संभाजी भिडेंची ‘पद्मश्री’साठी शिफारस करणाऱ्या फडणवीस सरकारचा हेतू साध्य होऊ देणार नाही, राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांचा इशारा http://abpmajha.abplive.in/

8. नोटबंदीच्या काळातील बँकांकडील पैशावर रिझर्व बँकच निर्णय घेईल, सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी हात झटकले http://abpmajha.abplive.in/

9. औरंगाबादमध्ये दोन आठवड्यानंतरही कचरा पडूनच, तोडगा काढण्यासाठी नारेगावच्या नागरिकांची विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात बैठक http://abpmajha.abplive.in/

10. तेलाच्या डब्यात पाणी, नाशिककरांची फसवणूक, मुंबई नाका पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या https://goo.gl/uKVG6D

11. नागपूर शेजारील जिल्हे मेट्रोने जोडण्यासाठी प्रयत्न, नितीन गडकरींचा पुढाकार, प्रस्ताव तयार करण्याच्या गडकरींच्या सूचना http://abpmajha.abplive.in/

12. छत्तीसगडमध्ये कमांडरसह दहा नक्षलवाद्यांचा खात्मा, तेलंगणा आणि छत्तीसगड पोलिसांची संयुक्त कारवाई, एका जवानाला वीरमरण https://goo.gl/QgMaVA

13. ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारच्या उजव्या पायावर तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज, नेमार रिअल माद्रिदविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीला मुकणार https://goo.gl/df2d1T

14. 'परी' पाहून बायकोचा अभिमान वाटला, चित्रपट पाहिल्यानंतर विराट कोहलीकडून अनुष्का शर्माचं कौतुक https://goo.gl/b55Esk

15. सुपरस्टार रजनीकांत आणि नाना पाटेकर यांच्या ‘काला’ सिनेमाचा टीझर रिलीज, अल्पावधीत 67 लाखांहून हिट्स https://goo.gl/nzwQJG

माझा कट्टा (पुन:प्रक्षेपण) : राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, पाहा रात्री 8 वाजता फक्त एबीपी माझावर...

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा