एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/05/2018


1.    ऑडिओ क्लिप माझीच, पण शिवसेनेकडून छेडछाड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार, मुख्यमंत्र्यांकडून नवी ऑडिओ क्लिप जारी https://goo.gl/DhmjPS

2.    मित्रा जनाची नाही, मनाची तरी ठेव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शिवसेना नेते आदेश बांदेकरांवर टीकास्त्र, ऑडिओ क्लिप प्रकरण तापलं https://goo.gl/LrRzFn

3.    पालघर पोटनिवडणुकीत पैशांचा पाऊस, उद्धव ठाकरेंचा आरोप, पैसे वाटताना भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेनं रंगेहात पकडले, कार्यकर्त्यांवर गुन्हा https://goo.gl/NNW7Li

4.    सलग तेराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महाग, पेट्रोल प्रतिलिटर 13 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 16 पैशांनी महागलं https://goo.gl/Fj3vCS

5.    2019 साली पुन्हा नरेंद्र मोदींना बहुमत मिळेल, भाजपाध्यक्ष आमित शाहांना विश्वास, तर काँग्रेसकडून ‘चार साल बेहाल’चा नारा https://goo.gl/zsHaXp

6.    सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी, गाझियाबादची मेघना श्रीवास्तव देशात पहिली, मेघनाला 500 पैकी 499 गुण https://goo.gl/pca8c7

7.    दहावी-बारावीच्या निकालाबाबत व्हॉट्सअॅपवर अफवा, मात्र निकालाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर करु, बोर्डाची माहिती https://goo.gl/mworYT

8.    दाढी-मिशी येणार, नावही बदलणार, बीडमधील पोलिस शिपाई ललिता साळवेची ललित कुमार बनण्याची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी https://goo.gl/nCgQfQ

9.    उंदीर, मांजर, सरडे, माशांचा वावर, अंबरनाथमध्ये निकृष्ट फरसाण बनवणाऱ्या कंपनीत मनसेची तोडफोड https://goo.gl/En1YKv

10.    पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजला आता विद्यापीठाचा दर्जा, 55 कोटींचं अनुदान मिळणार, झेव्हिअर्स आणि मिठीबाई वेटिंग लिस्टवर https://goo.gl/UUdCjw

11.    पुणे जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान, सरपंचपदासाठी 226, तर सदस्यपदासाठी 1160 उमेदवार रिंगणात https://goo.gl/TVauH7

12.    पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास आता क्राईम ब्रान्चकडे, कुख्यात गुंड श्वेत्या आरोपी असल्याने कारवाईस पोलिसांची टाळाटाळ, नातेवाईकांचा आरोप https://goo.gl/QXsMDe

13.    मध्य आणि हार्बर मार्गावर शेवटची लोकल आज लवकर सुटणार, कुर्ला आणि सायन स्थानकांदरम्यानचा पादचारी पूल तोडण्यासाठी मेगाब्लॉक https://goo.gl/9LP9dS

14.    रायगडमधील अलिबाग इथल्या नागाव समुद्रकिनारी तीन जण बुडाले, शुक्रवारी रात्रीची घटना, शोधकार्य सुरु, बुडालेली तीन मुलं नवी मुंबईतील कोपरखैराणेचे रहिवासी http://abpmajha.abplive.in/

15.    आयपीएल गाजवणाऱ्या फिरकीपटू रशीद खानने भारताकडून खेळावं, सोशल मीडियावरुन मागणी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि अफागाणिस्तानच्या अध्यक्षांकडूनही दखल https://goo.gl/WhjXJs

माझा कट्टा : अभिनेता आमिर खानशी मनमोकळ्या गप्पा, पाहा माझा कट्टा रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive   

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा