मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेचा महामोर्चा काही वेळात निघणार आहेत. देशभरातील सर्वच मीडियाचं या महामोर्चाकडे लक्ष आहे. मात्र राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचं लक्ष एबीपी माझावर आहे. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी एबीपी माझा पाहिलं जात आहे. एबीपी माझावर मनसेच्या महामोर्चाची बित्तंबातमी दाखवली जात आहे. त्यामुळेच कृष्णकुंजवर एबीपी माझाला पसंती दिली जात आहे.



राज ठाकरे यांची आजच्या महामोर्चाच्या तयारीवर बारीक नजर आहे. मनसे नेते अनिल शिदोरे यांना राज ठाकरे यांनी स्वत: आर्म बँड बांधला. राज ठाकरे आणि अनिल शिदोरे यांचा हा फोटो आजचा मोर्चा मनसेसाठी किती महत्त्वाचा आहे, हे दर्शवतो आहे.  मनसेचे सर्व नेते या महामोर्चासाठी सज्ज झाले आहेत. राज्यभरातून हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.



राज ठाकरे यांच्या आझाद मैदानातील सभेच्या व्यवस्थेची वैशिष्ट्य ?

राज ठाकरे आझाद मैदानात ज्या मंचावरुन आज भाषण करणार आहेत, त्यावर 'पाकिस्तानी-बांगलादेशीयांनो, चले जाव' असा एका ओळीचा संदेश देत राज ठाकरे यांचे छायाचित्र असणारा कट आऊट लावण्यात आला आहे. मंचाच्या दोन्ही बाजूला मनसेचा राजमुद्रा असलेले झेंडे तर मध्यभागी देशाचा तिरंगा फडकवला जाणार आहे. भव्य मोर्चा असूनही सभास्थळी तुरळक खुर्च्या आहेत, कारण सर्व पदाधिकारी जमिनीवर बसणार असून फक्त ज्येष्ठ नागरिक खुर्चीवर बसणार आहेत. सभेला भारतीय बैठकीचा नवा पायंडा मनसे पाडताना दिसत आहे. मंचावर इतर महापुरुषांसह स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटोही लावण्यात येणार आहे.