मुंबई: मराठी मनावर अधिराज्य गाजवणारं आपलं लाडकं न्यूज चॅनेल आज 11 वर्षे पूर्ण करत आहे. 22 जून 2007 रोजी म्हणजेच आजच्या दिवशी अकरा वर्षांपूर्वी सुरु झालेला ‘एबीपी माझा’चा हा प्रवास, आज यशाची अनेक शिखरं गाठून आगामी काळात नव्या क्षितीजांना गवसणी घालायला सज्ज आहे.
महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावातून आलेल्या अनेक पत्रकारांनी त्यांच्या कारिकिर्दीला एबीपी माझातून सुरु केली.
विविध विषयांचे आणि आशयांचे सर्वांना सामावून घेणारे कार्यक्रम हीच एबीपी माझाची मुख्य ओळख. गेली अकरा वर्ष आपल्या कामगिरीतलं सातत्य राखणं हे मोठं आव्हान पेललेलं हे न्यूज चॅनल.
महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या काही जाणत्या तर बऱ्याचशा नवख्या चेहऱ्यांना संधी देत 24 तास मराठी वृत्तवाहिनी सुरू करण्याचा हा धाडसी प्रयोग, आज वृत्तवाहिन्यांच्या जगात एक तप साजरं करण्याच्या उंबरठ्यावर आला आहे.
अनेक मंडळी एका आश्वासक चेहऱ्याकडे बघून मराठीत पत्रकारितेत उतरली होती, तो चेहरा आहे एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांचा.
राजीव खांडेकर यांच्या नेतृत्त्वात सुरु झालेला तरुण पत्रकारांचा प्रवास यशाची अनेक शिखरं पादाक्रांत करत सुरुच आहे.
‘माझा’ची विविध बातमीपत्र, डॉक्युमेंटरी, घे भरारी, ढॅण्टॅढॅण, खेळ माझा, सात बाराच्या बातम्या, पैसा झाला मोठा, माझा विशेष, माझा कट्टा यासारख्या विशेष कार्यक्रमांमुळे राज्यभरातील प्रेक्षकांनी माझाला 11 वर्षांपासून अव्वलस्थानी कायम ठेवलं आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेम आणि भरवशाच्या जोरावर एबीपी माझाचा प्रवास सुरु आहे.
सर्वांचे आभार!
न्यूज चॅनल ते न्यूज चॅलेंज, एबीपी माझाचा 11 वर्षांचा प्रवास!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jun 2018 09:50 AM (IST)
22 जून 2007 रोजी म्हणजेच आजच्या दिवशी अकरा वर्षांपूर्वी सुरु झालेला ‘एबीपी माझा’चा हा प्रवास आज यशाची अनेक शिखरं गाठून आगामी काळात नव्या क्षितीजांना गवसणी घालायला सज्ज आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -